अनिल गोटे 
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Assembly Election : धुळ्यात मोठी उलथापालथ! अनिल गोटे यांना ठाकरेंकडून उमेदवारी मिळणार

Dhule politics news : धुळ्यात ठाकरे गट शिवसेनेत मोठी उलथापालट, गोटे यांना ठाकरे गट शिवसेनेतर्फे दिली जाणार उमेदवारी

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Election 2024: धुळ्यात ठाकरे गट शिवसेनेत मोठी उलथापालथ होत आहे. माजी आमदार अनिल गोटे यांना शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर होणार आहे. माजी आमदार अनिल गोटे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे समोर आलेय. 24 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे, माजी आमदार अनिल गोटे यांनी साम टीव्हीसोबत बोलताना ठाकरे गटाच्या प्रवेशाबाबत सांगितले. ते म्हणाले की, खासदार संजय राऊत यांनी फोनद्वारे मातोश्रीवर येण्याचे निमंत्रण दिले आहे.

धुळ्यात ठाकरे गट शिवसेनेत मोठी उलथापालट होताना दिसून येत आहे, माजी आमदार अनिल गोटे यांना शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर केली जाणार आहे. याबाबतची माहिती स्वतः माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली असून मातोश्रीवरून त्यांना पक्षप्रवेशासाठी बोलावणं आल असल्याची माहिती देखील गोटे यांनी दिली आहे.

24 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे माजी आमदार अनिल गोटे यांचा ठाकरे गट शिवसेनेमध्ये प्रवेश सोहळा पार पडणार असल्याची देखील माहिती गोटे यांनी दिली आहे, खासदार संजय राऊत यांनी फोनद्वारे मातोश्री वर येण्याचे निमंत्रण दिले असल्याचे अनिल गोटे यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत धुळ्यात आले असता गोटे यांच्याशी त्यांची बंद दाराआड जवळपास 20 मिनिटे चर्चा पार पडली होती. तेव्हापासूनच त्यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा राजकीय वर्तळात सुरू होती, परंतु आज संजय राऊत यांचा फोन आला असल्याची माहिती देत आपल्याला मातोश्रीवरून पक्षप्रवेशाचे निमंत्रण आले असल्याची माहिती गोटे यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Exclusive : कौल महाराष्ट्राचा : विधानसभा निवडणुकीतलं सर्वात पहिलं 'साम'चं सर्वेक्षण

Maharashtra News Live Updates: निलेश राणे उद्या शिवसेनेत करणार प्रवेश

VIDEO : कुर्ला, चुनाभट्टीमध्ये भाजपला धक्का; 1 हजार कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Sharp Eyes: तुमची दृष्टी तीक्ष्ण करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

SCROLL FOR NEXT