ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
निरोगी, संतुलित आहार ही डोळ्यांच्या मजबुतीची गुरुकिल्ली आहे. जर तुम्ही योग्य पदार्थांचे सेवन केले, तर तुमच्या दृष्टीसाठी सर्व आवश्यक पोषक तत्वे मिळू शकतात.
व्हिटॅमिन सी युक्त फळे म्हणजे संत्री, टेंगेरिन्स, लिंबू आणि द्राक्षे यांसारखी लिंबूवर्गीय फळे तुमच्या डोळ्यांना ऑक्सिडेटिव्ह नुकसानीपासून वाचवण्यास मदत करतात.
गाजरात बीटा-कॅरोटीनचे व्हिटॅमिन ए असते. हे पोषक तत्व चांगली दृष्टी राखण्यासाठी आणि रातांधळेपणा टाळण्यास मदत करते.
पालक, मेथी आणि हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए आणि ल्युटीन या दोन्हीचे उत्कृष्ट स्रोत आहेत. त्याने डोळ्यांना हानिकारक प्रकाशापासून वाचवले जाते.
बदामामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. जे रॅडिकल्समुळे होणाऱ्या वया संबंधित नुकसानापासून तुमच्या डोळ्यांचे रक्षण करते.
लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगात असलेल्या शिमला मिरचीचे सेवन केल्याने व्हिटॅमिन सी मिळते. त्याने तुमच्या डोळे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचू शकतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT: सुंदर तजेलदार त्वेचेसाठी 'या' सोप्या टिप्स फॉलो करा