Ajit Pawar NCP Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : अमरावतीमध्ये अजित पवारांची मोठी खेळी, काँग्रेस आमदार घड्याळ हातात घेणार?

Namdeo Kumbhar

Ajit Pawar Amravati : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर आहेत. आमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांनी अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत. अजित पवारांच्या बॅनरमुळे शहरात एकच चर्चा रंगली आहे. सुलभा खोडके राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? याबाबत अमरावतीच्या राजकारणात चर्चा रंगली आहे.

काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके ह्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा अंदाज याआधीच साम टीव्हीने कालच दर्शवला होता. आता शहरातील बॅनरमुळे काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश करणार असल्याची शक्यता अधिक वाढली आहे.

आमदार सुलभा खोडके यांच्या अमरावती विधानसभा मतदारसंघातील अनेक कामांच्या भूमिपूजनासाठी आज अजित पवार उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर शहरात झळकलेत.

सुलभा खोडके अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार?

अमरावती येथील काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांच्या विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या हस्ते कोट्यवधि रुपयांच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. सुलभा खोडके या काँग्रेसच्या आमदार असल्या तरी कोणताही काँग्रेसचा बडा नेता या कार्यक्रमासाठी येणार नसल्याचे समजतेय. त्यामुळे सुलभा खोडके या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा अमरावतीमध्ये सुरु आहे.

सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके हे अजित पवार यांचे सचिव आहेत. त्यामुळे सुलभा खोडके यांचा अजित पवार गटात प्रवेश होणार असल्याचे मानले जात आहे. सुलभा खोडके आगामी विधानसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून लढणार आहेत.

सुलभा खोडके कोण आहेत?

सुलभा खोडके याआधी एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्या आधीपासून अजित पवारांच्या संपर्कात आहेत. मागील निवडणुकीआघी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत त्या काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या. २००४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून पहिल्यांदा आमदारकी मिळवली होती. २००९ मध्ये रवी राणा यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला. २०१४ मध्येही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरत विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात; 'या' महिलांना मिळणार ४५०० रुपये

Nagpur News: शाळेत खेळताना पडला, दवाखान्यात न नेता शिक्षकांनी विद्यार्थ्याला बेदम मारलं; नागपुरमधील धक्कादायक घटना

Jammu-Kashmir News : जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; जैश-ए-मोहम्मदच्या ६ साथीदारांना अटक

Mumbai Local Train : मुंबईकरांचा पुन्हा होणार खोळंबा, रविवारी रेल्वेच्या या मार्गावर ब्लॉक; अनेक लोकल रद्द

Weather Update : परतीच्या पावसाची चाल थबकली, महाराष्ट्रात पुन्हा पडणार जोरदार पाऊस; आज या जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT