Maharashtra Politics  Google
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Assembly Election : भाजपचा अजित पवारांसाठी 'त्याग', अकोट सोडलं? अमोल मिटकरींना तिकीटासाठी दादांचा फोन!

Maharashtra Politics : अकोट मतदार संघातून मिटकरींनी मागितली उमेदवारी. भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांचं तिकीट कापणार? आमदार अमोल मिटकरींना अजित पवारांचा फोन; मिटकरी अकोल्यातून मुंबईकडे रवाना

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Maharashtra Assembly Election 2024: अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघासाठी महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं जोरदार आग्रह धरलाय. यासंदर्भात आमदार अमोल मिटकरींना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तातडीने मुंबईला पाचारण केलंय. आपल्या वाहनाने तातडीने आमदार अमोल मिटकरी अकोल्यातून मुंबईकडे निघाले आहेय. अकोट मतदारसंघातून आमदार अमोल मिटकरींनी स्वत:साठी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. उद्या देवगिरीवर अजित पवार आणि आमदार अमोल मिटकरींची अकोटसंदर्भात भेट होणार आहे. (Akola Akot Assembly constituency Election news in marathi )

दरम्यान, अकोटमध्ये 2014 आणि 2019 अशा दोन टर्म्स भाजपचे प्रकाश भारसाकळे आमदार आहे. भाजपच्या पहिल्या यादीत अकोटचा समावेश नाहीये. त्यामूळे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांचं तिकीट कापलं जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. याच पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरींना मुंबईत पाचारण केल्याने सर्वांच्या भावना ताणल्यायेत. उद्या सकाळी 8.30 वाजता देवगिरीवर अजित पवार आणि आमदार अमोल मिटकरींची अकोटसंदर्भात भेट होणारेय. त्यामूळे अकोट मतदारसंघ राष्ट्रवादीला जाणार का?, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागलीये. दरम्यान अकोटवर माझा नैसर्गिक हक्क आहे. कारण, माझा जन्म या मतदारसंघातला आहे. इतर सर्व उमेदवार मतदारसंघाबाहेरचे आहे, विकासकामे कमी झाल्याने जनतेत नाराजी आहे. भाजप आमदाराबद्दल नाराजीचे रिपोर्टस असल्याने त्यांचे पहिल्या यादीत नाव नसल्याच अमोल मिटकरी म्हटले.

अकोट मतदारसंघासाठी महायुतीतील तिन्ही पक्षात वाद आहे. इथं भाजपच प्राबल्य असलेल्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दावा केलाय.. तर शिंदे गटाचा इथं दावा आहे. भाजपकडून विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे, माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, डॉ.रणजित सपकाळ, माजी नगराध्यक्ष पुरूषोत्तम चौंखडे, ऍड.विशाल गणगणे आणि इतर अनेक इच्छुक आहेय. तर अजित पवारांच्या पक्षातून विधान परिषद आमदार अमोल मिटकरी हे इच्छुक आहेत. अजित पवारांकडे मिटकरींनी उमेदवारीची मागणी केली. गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघात कामकाज सुरूये. मात्र, शिंदे शिवसेनेकडून माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया हे आग्रह धरून बसले आहे. दरम्यान हा मतदारसंघ आता कुणाच्या वाटेवर जातो? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

अकोट मतदारसंघात 2019 मध्ये प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते -

भाजपाचे प्रकाश भारसाकळे 7,260 मतांनी विजयी 

उमेदवार           -        पक्ष        -     मते 

प्रकाश भारसाकळे  -    भाजप  -     48586

संतोष रहाटे          -      वंचित    -    41326

अनिल गावंडे        -      अपक्ष     -    28183

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: औसामध्ये भाजपचे अभिमन्यू पवार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra exit polls : माकप डहाणूचा गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT