Ajit Pawar vs yugendra Pawar baramati vidhan sabha election : बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना पराभवाचा जोरदार धक्का बसला होता. सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाला होता. या पराभाची सल अजित पवार यांच्या मनात कायम आहे. अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत ती सल आणि मनातील खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली. लोकसभेला बारामतीकरांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला, अशी खंत अजित पवार यांनी बोलून दाखवली. अजित पवार यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
लोकसभेला साहेबांना वाईट वाटू नये म्हणून ताईंना मोठ्या संख्येने मतदान केले आणि बारामतीकरांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला. मी तो स्वीकारला, असे अजित पवार म्हणाले. ते सोमेश्वरनगर येथे झालेल्या सभेमध्ये बोलत होते. अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची खंत पुन्हा एकदा बोलून दाखवली. याआधी प्रचारसभेमध्ये कार्यकर्त्यांनी एकच वादा, अजितदादा आशा घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी अजित पवार यांनी लोकसभेला वादा कुठे गेला होता? असा सवाल उपस्थित केला होता. त्याशिवाय कुटुंबात उमेदवार द्यायला नको होता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती. आता त्यात आणखी भर पडली आहे. बारामतीकरांनी लोकसभेला करेक्ट कार्यक्रम केला. तो मी स्वीकारला, अशी खंत त्यांनी पुन्हा एखदा बोलून दाखवली आहे.
मनातील खदखद बोलून दाखवतानाच अजित पवार यांनी विधानसभेला मतदान करण्याचे आवहान केले. ते म्हणाले की, लोकसभेला बारामतीकरांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला. मी तो स्वीकरारला. आता येणाऱ्या विधानसभेला मी हक्काने मत मागण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे. त्यामुळे यावेळेस मला खूश करण्यासाठी मला मतदान करा, असं आवाहन देखील अजित पवारांनी गावकऱ्यांना केलं. यावेळी अजित पवार सोमेश्वरनगर येथे बोलत होते.
लोकसभेला झालेल्या पराभवाची सल मनात घेऊन अजित पवार आता विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. अजित पवार बारामतीमध्ये विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. अजित पवार यांच्यापुढे पुतण्याचे आव्हान आहे. शरद पवार यांनी बारामतीच्या मैदानात आता युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवले आहे. बारामतीमधील पवार कुटुंबातील लढाईकडे सर्वांचे लक्ष लागलेय. शरद पवार यांनी बारामतीमध्ये आपली ताकद पणाला लावली आहे. अजित पवारांपुढे मोठं आव्हान उभं राहिलेय. पवार कुटुंबातील कलह दिवाळीमध्ये दिसून आला होता. आता विधानसभेचं मैदान कोण मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.