Maharashtra Assembly Elections

Assembly Election: नवाब मलिकांच्या प्रचारासाठी अजित पवार मैदानात; भाजपच्या विरोधाला दादांचा ठेंगा

Assembly Election: नवाब मलिकांसाठी अजित पवार महायुतीविरोधात प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. नवाब मलिकांना मानखुर्द-शिवाजीनगरमधून उमेदवारी देण्यात आलीय.

Tanmay Tillu

मलिक राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेनंही उमेदवार दिल्यामुळे दादा आता महायुतीविरोधात मैदानात उतरले आहेत. पाहूयात यावरचा विशेष रिपोर्ट. भाजप आणि शिंदे गटानं जोरदार विरोध करूनही अजित पवारांनी नवाब मलिक यांना आपल्या पक्षाची उमेदवारी दिली. त्यामुळे शिवाजीनगर मानखुर्दच्या मैदानात शिंदे गटानं आपला उमेदवार मैदानात उतरवला.

मलिकांचा नव्हे तर शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं भाजपनं जाहीर केलं. त्यामुळे अजितदादा महायुतीतला वाद चव्हाट्यावर यायला नको म्हणून प्रचारापासून दूर राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं....मात्र दादांनी मलिकांच्या प्रचारासाठी थेट रिंगणात उडी घेतलीय.

महायुतीत अजित पवार सहभागी झाल्यापासून नवाब मलिकांवरून महायुतीत खटके उडतायत. नुकतचं, आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केली होती. अजित पवारांच्या पक्षाच्या घड्याळाचे आधीच 12 वाजलेत. असं वक्तव्य धस यांनी केलं होतं.त्यामुळे महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला.

त्यामुळे अजितदादा भाजपसोबत सत्तेत राहूनही भाजपच्या विरोधाला झुगारतायत. दादा किंगमेकर ठरले तर हाच विरोध भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार का ? आणि त्यामुळे राज्यात पुन्हा नव्या समीकरणांची जुळवाजुळव होणार का हेच पाहायचं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT