NCP Ajit Pawar Group  Free Press journal
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Assembly Election : कुणाला संधी, कुणाचं तिकीट कापलं? अजित पवार गटाच्या यादीची १० वैशिष्ट्ये

Maharashtra Vidhan Sabha Election : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

Rupali Badhave

Maharashtra assembly Election 2024: भाजप आणि शिवसेनेनंतर अजित पवार यांनी आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ३८ उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजप ९९, एकनाथ शिंदे ४५ आणि अजित पवार ३८... महायुतीकडून एकूण १८२ उमेदवारांची घोषणा केली आहे. महयुतीकडून अद्याप काही जागांवर पेच आहे. उर्वरित यादी थोड्याच दिवसात येण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी आपल्या पहिल्या यादीमध्ये बंडामध्ये साथ देणाऱ्या शिलेदारांवर विश्वास दाखवलाय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जारी करण्यात आलेल्या यादीचे वैशिष्ट्ये जाणून घेऊयात... Ajit Pawar NCP announces first list of 38 candidates Maharashtra elections

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी यादीची ठळक वैशिष्ट्ये -

  • अजित पवार बारामती मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरणार, त्यांचा सामना युगेंद्र पवार यांच्याशी होण्याची शक्यता.

  • अजित पवार यांनी बंडाच्या वेळी सोबत असणार्‍या जवळपास सर्वच विद्यमान आमदारांना तिकीट दिलेय.

  • ९ मंत्र्यांना पहिल्या यादीत तिकीट देण्यात आले. त्यामध्ये धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे यांच्या नावाचा समावेश आहे.

  • वडगाव शेरीमधील सस्पेन्स कायम, उमेदवारीची घोषणा नाहीच.

  • राजेश विटेकर यांच्या आई निर्मला विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली.

  • राजकुमार बडोले यांचा कालच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश झाला. आज त्यांना अर्जुनी मोरगाव येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली. मनोहर चंद्रिकापुरे यांचं तिकीट कापलेय. चंद्रिकापुरे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे, ते तुतारीवर लढण्याची शक्यता.

  • प्रकाश सोळंके यांनी मुलासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने पुन्हा त्यांच्याच नावाची घोषणा केली आहे.

  • कळवा मुंब्रा मतदारसंघात पक्षाने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नजिब मुल्ला यांना उमेदवारी देण्यात आली.

  • हिरामण खोसकर आणि सुलभा खोडके हे काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आले आणि पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केली.

  • विद्यामान ३२ आमदारांना पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थान दिलेय. सहा नव्या शिलेदारांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये हिरामण खोसकर, भरत गावित, सुलभा खोडके, नजीब मुल्ला, राजकुमार बडोले आणि निर्मला विटेकर यांचा समावेश आहे.

  • ३८ जणांच्या पहिल्या यादीमध्ये चार महिला उमेदवारांना संधी देण्यात आली. सरोज आहिर

    निर्मला विटेकर, अदिती तटकरे आणि सुलभा खोडके यांचा समावेश आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी यादी -

बारामती - अजित पवार

येवला - छगन भुजबळ

आंबेगाव - दिलीप वळसे पाटील

कागल - हसन मुश्रीफ

परळी - धनंजय मुंडे

दिंडोरी - नरहरी झिरवाळ

अहेरी - धर्मरावबाबा आत्राम

श्रीवर्धन - आदिती तटकरे

अंमळनेर - अनिल पाटील

उदगीर - संजय बनसोडे

अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले

माजलगाव - प्रकाश दादा सोळंके

वाई - मकरंद पाटील

सिन्नर - माणिकराव कोकाटे

खेड आळंदी - दिलीप मोहिते

अहमदनगर शहर - संग्राम जगताप

इंदापूर - दत्तात्रय भरणे

अहमदपूर - बाबासाहेब पाटील

शहापूर - दौलत दरोडा

पिंपरी - अण्णा बनसोडे

कळवण - नितीन पवार

कोपरगाव - आशुतोष काळे

अकोले किरण लहामटे

वसमत - चंद्रकांत नवघरे

चिपळूण - शेखर निकम

मावळ - सुनील शेळके

जुन्नर - अतुले बेनके

मोहोळ - यशवंत विठ्ठल माने

हडपसर - चेतन तुपे

देवळाली - सरोज अहिरे

चंदगड - राजेश पाटील

इगतपुरी - हिरामण खोसकर

तुमसर - राजू कोरमेर

पुसद - इंद्रनील नाईक

अमरावती शहर - सुलभा खोडके

नवापूर - भरत गावित

पाथरी - निर्माला उत्तमराव विटेकर

मुंब्रा कळवा - नजीब मुल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT