WORLI SAAM TV
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election Result: वरळीत कांटे की टक्कर, मिलिंद देवरा-आदित्य ठाकरेमध्ये टफ फाईट, कधी आघाडी- कधी पिछाडी

Maharashtra Election Result: वरळीच्या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे कधी आघाडीवर तर कधी पिछाडीवर असल्याची माहिती आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मुंबईमध्ये हायव्होलटेज लढती पैकी एक मानली जातेय ती वरळी मतदार संघाची लढत. मात्र या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. वरळीच्या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे कधी आघाडीवर तर कधी पिछाडीवर असल्याची माहिती आहे. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या मिलिंद देवरांकडे काही वेळापूर्वी आघाडी होती.

वरळीतून शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत होती. यामध्ये आदित्य ठाकरे विरूद्ध मिलिंद देवरा यांच्यामध्ये ही लढत होती. पहिल्या फेरीतील मतमोजणीत आदित्य ठाकरे आघाडीवर होते. मात्र त्यानंतर आदित्य ठाकरे ५९७ मतांनी पिछाडीवर होते. त्यामुळे हा मोठा धक्का शिवसेना ठाकरे गटासाठी मानला जाऊ शकतो.

सध्या मतमोजणीच्या आकड्यांनुसार, महाविकास आघाडी ५४ जागांवर आघाडीवर आहे. तर महायुती २१६ जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडे १९ जागा असून शिंदे गटाकडे ५६ जागा आहेत.

वरळी विधानसभा जागा ही महाराष्ट्रातील हाय प्रोफाईल जागा मानली. ही जागा मुंबईतील सर्वात पॉश आणि समृद्ध भागांपैकी एक आहे. वरळीची जागा शिवसेनेचा बालेकिल्ला मानली जाते. आदित्य ठाकरे विद्यमान आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी ही जागा जिंकून त्यांचा निवडणूकीतील पहिला विजय मिळवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT