Lok Sabha Election 2024:
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) शनिवारी बैठक होणार असून त्यात रायबरेली, अमेठी आणि इतर काही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली जाऊ शकते. शनिवारी सायंकाळी सीईसीची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सीईसीच्या बैठकीत उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदारसंघांवर चर्चा होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. काँग्रेसने अद्याप अमेठी आणि रायबरेलीमधून आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत. मात्र आतापर्यंत पक्षाने देशभरात 317 उमेदवार जाहीर केले आहेत.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यावेळी रायबरेलीतून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्या राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून आल्या आहेत. त्या येथून गेल्या वीस वर्षांपासून खासदार होत्या.
तर राहुल गांधी 2004 ते 2019 या काळात अमेठीतून लोकसभा सदस्य होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा या जागांवरून निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. असं असलं तरी अद्याप पक्षाच्या वतीने याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
यातच नुकतेच गाझियाबाद येथे पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांना अमेठीतून निवडणूक लढविण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, हा निर्णय पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत घेतला जाईल आणि पक्षाकडून जो काही आदेश येईल, तो ते मान्य करतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.