Devendra Fadnavis On Poonam Mahajan Saam Tv
लोकसभा २०२४

Devendra Fadnavis: भाजपने पूनम महाजन यांचे तिकीट का कापले? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण

Maharashtra Politics: दोन वेळा खासदार म्हणून निवडून आल्यानंतरही भारतीय जनता पक्षाने खासदार पूनम महाजन यांचं तिकीट का कापलं? असा प्रश्न अजूनही बऱ्याच लोकांना पडला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Devendra Fadnavis On Poonam Mahajan:

दोन वेळा खासदार म्हणून निवडून आल्यानंतरही भारतीय जनता पक्षाने खासदार पूनम महाजन यांचं तिकीट का कापलं? असा प्रश्न अजूनही बऱ्याच लोकांना पडला आहे. यातच अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रचार सभेत प्रमोद महाजन यांच्या मुलीचं तिकीट का कापलं? असा प्रश्न थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला होता. याचंच उत्तर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

The Lallantop ला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी याचं उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, ''पूनम महाजन यांच्याबद्दल बोलायचं झालं तर, तुम्ही अनेक राज्यात पाहिलं असेल, भाजपने जे खासदार आहे, त्यांनाच आमदारकी लढवण्याचे तिकीट दिले आहे. राज्यात लोकसभा पाठोपाठ लगेच विधानसभा निवडणूक होत असल्याने काही खासदारांना पुन्हा राज्यात पाठवण्यात आलं आहे. यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे, यात कोणाचंही तिकीट कापण्यात आलेलं नाही.

पूनम महाजन यांना विधानसभेचे तिकीट देण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, ते त्यांच्या हातात नाही, पण त्यांच्या म्हणण्यानुसार, भाजप पूनम महाजन यांना लवकरच काही जबाबदारी देऊ शकते.

दरम्यान, यावेळी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपने ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांच्या जागी वकील उज्ज्वल निकम यांना तिकीट दिले आहे. वडील प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर पूनम महाजन यांनी 2006 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2009 मध्ये त्यांनी घाटकोपर पश्चिममधून पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली. पण यात त्यांचा पराभव झाला होता.

पुढे 2014 मध्ये त्यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव केला. 2019 मध्ये पूनम यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांचा पराभव करून विजयाची मिळवला. पूनम या ट्रेंड पायलट आहेत. त्यांना 300 तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कणकवलीमधून नितेश राणे यांचा विजय

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT