Kolhapur Lok Sabha Uddhav Thackeray Sabha  Saam TV
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha: शाहू महाराजांच्या विजयासाठी उद्धव ठाकरे मैदानात; कोल्हापुरात घेणार जंगी सभा

Kolhapur Politics News: कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू महाराज यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्याच्या विजयासाठी उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात सभा घेण्याचं ठरवलं आहे.

Satish Daud

Kolhapur Lok Sabha Uddhav Thackeray Sabha

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून यावेत, यासाठी उद्धव ठाकरे ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. पुढील काही दिवस राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचा प्लान उद्धव ठाकरेंनी आखला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

येत्या २ मे रोजी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  कोल्हापुरात जंगी सभा घेणार आहेत. कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू महाराज यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्याच्या विजयासाठी उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात सभा घेण्याचं ठरवलं आहे. अर्थातच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत.

सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ महायुतीकडे आहे. याठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे (Eknath Shinde) संजय मंडलिक हे विद्यमान खासदार आहेत. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मंडलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा जवळपास पावणेतीन लाख मतांनी पराभव केला होता.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर संजय मंडलिक यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे कोल्हापुरातील शिवसेनेत दोन गट पडले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोल्हापूर लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला सोडण्यात आली आहे. काँग्रेसने या जागेवर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

दरम्यान, संजय मंडलिक यांना शह देण्यासाठी आणि शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे २ मे रोजी कोल्हापुरात जंगी सभा घेणार आहेत. त्यामुळे या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. या सभेनंतर ३ मे रोजी उद्धव ठाकरे कणकवली मतदारसंघात सभा घेणार आहेत. कणकवलीतून ठाकरे गटाने विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात बिबट्यानंतर माकडांची दहशत, सोसायटीत माकडांची घुसखोरी

Railway Recruitment: खुशखबर! कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; ४११६ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Local Body Election : काँग्रेस जिल्हाअध्यक्षाचे अपहरण अन् मारहाण, VIDEO ने महाराष्ट्रात खळबळ, हिंदुत्ववादी संघटनेवर आरोप

गुवाहाटी टेस्टमधील पराभव जिव्हारी लागणार, WTC Points Table मध्ये पाकिस्तानच्या खाली जाणार भारत, पाहा समीकरण

Mahayuti: अजित पवारांच्या आमदाराकडून काँग्रेसचा प्रचार, महायुतीतील संघर्ष टोकाला

SCROLL FOR NEXT