Uddhav Thackeray and Devendra Fadnavis  SAAM TV
लोकसभा २०२४

Uddhav Thackeray: फडणवीस म्हणाले होते, आदित्यला CM पदासाठी तयार करतो; मी दिल्लीला जातो.. उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा दावा!

Uddhav Thackeray On Devendra Fadanvis: इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजप- सेना युती तुटण्याचे कारण सांगतानाच देवेंद्र फडणवीसांबाबत एका मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Gangappa Pujari

मुंबई, ता. २० एप्रिल २०२४

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. कधीकाळी एकत्र सत्तेत असलेले शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी अलिकडेच 'इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजप- सेना युती तुटण्याचे कारण सांगतानाच देवेंद्र फडणवीसांबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

या मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना- भाजप युती का तुटली? याबाबत खुलासा केला. तसेच यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याबाबत बोलताना फडणवीसांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत चर्चा केली होती, असा सर्वात मोठा गौप्यस्फोटही केला आहे.

"मी माझ्या वडिलांना (बाळासाहेब ठाकरे) वचन दिले होते की राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल. त्याप्रमाणे सेना आणि भाजपकडे 2.5 वर्षे मुख्यमंत्रीपद असेल असे अमित शहा यांच्याशी चर्चेमध्ये ठरले होते. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, मी माझ्या मुलाला आदित्यला मुख्यमंत्री बनवू आणि ते स्वतः दिल्लीला जातील," असा मोठा दावा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.

शहा अध्यक्ष झाल्यानंतर चाल बदलली...

आम्ही ‘हिंदुत्व’ आणि ‘राष्ट्रवाद’ या मुद्द्यांवर भाजपसोबत होतो. तुम्ही देश सांभाळा, आम्ही राज्य सांभाळू, असे बाळासाहेब ठाकरे त्यांना म्हणाले होते. मात्र अमित शहा (Amit Shah) पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची चाल बदलली, असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगावच्या सराफा बाजारपेठेत सोने-चांदीचे दर वाढले

Home Decoration Ideas : या ६ प्रकारे सजवा तुमच्या स्वप्नातील नवीन घर, अधिक सुंदर दिसेल

Shocking: धावत्या लोकलमधून तरुणीला फेकलं, नवी मुंबई हादरली; थरकाप उडवणारा VIDEO समोर

Kidney Damage: व्हिटॅमिन B12 च्या गोळ्या किडनीचं करतात नुकसान; तज्ज्ञांनी सांगितलेली कारणे एकदा वाचाच

भीषण अपघाताचा थरार! भरधाव बस अचानक उलटली, १६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT