Uddhav Thackeray On PM Modi Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: टेम्पो भरभरून माल पाठवला जात असेल, तर देशातला काळा पैसा अजूनही तसाच; उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा

Uddhav Thackeray News: ''टेम्पो भरभरून माल पाठवला जात असेल, तर देशातला काळा पैसा अजूनही तसाच आहे'', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Uddhav Thackeray On PM Modi:

''टेम्पो भरभरून माल पाठवला जात असेल, तर देशातला काळा पैसा अजूनही तसाच आहे'', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंबानी आणि अदानी यांनी काँग्रेसला टेम्पो भरभरून पैसे दिल्याचा आरोप केला होता. यावरच भाष्य करताना उद्धव ठाकरे आज नाशिक येथील सभेत असं म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले, ''भाजपची मला काळजी वाटते. २ वर्षांनंतर मोदी तुम्ही झोळी घेऊन निघून जाल, तेव्हा भाजपची काय अवस्था होईल. निदान इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचे खूप चेहरे आहेत, तुमच्याकडे आहे का? मोदी सगळीकडे फिरा, सगळीकडे तुमचा सुपडा साफ होईल.''

ते म्हणाले, ''महाराष्ट्राने तुम्हाला ४० पेक्षा जास्त खासदार दिले, त्यांच्या उपकाराची फेड तुम्ही अपकाराने करता. १० वर्षे तुम्ही महाराष्ट्र आणि देशाला फिरवलं, जसे आमचे उद्योग नेले तसे तुमचे मस्तवाल नेते देखील घेवून जा. प्रफुल्ल पटेल तुम्हाला महाराष्ट्र समजावून घ्यावा लागेल. मोदी तुम्ही नुसत बाळासाहेब म्हणू नका, हिंदुहृदयसम्राट म्हणा.''

उद्धव ठाकरे म्हणाले की, ''मोदी आज नाशिकमध्ये होते. त्यांना एवढा ताण पडलाय की, ते झोपत नाही. झोप झाली नाही की लोक डोकं ठिकाणावर राहत नाही, भ्रमिष्ट होतात. त्यांची एवढी मजल गेलीय की मला नकली संतान म्हणतायत. मी तुम्हाला माझा जन्माचा दाखला मागितलेला नाही. मोदी तुम्ही ब्रम्हदेव नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Janmashtami 2025 : लाडक्या कान्हाला '५६ भोग' असा नैवेद्यच का अर्पण केला जातो?

Child Birth Rate : लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाचा मोठा निर्णय; मुलाच्या जन्मासाठी मिळणार तब्बल ६ लाख रुपये

Maharashtra Live Update: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Latur Tourism : विकेंड गेटवे! लातूरमधील किल्ले, मंदिरे आणि निसर्गरम्य ठिकाणं तुमची वाट पाहतायेत, लगेचच द्या भेट

Chetana Bhat: असं रुप पाहिलं अन् मन गहिरवरुन आलं...

SCROLL FOR NEXT