Uddhav Thackeray In Nashik Rally 
लोकसभा २०२४

Uddhav Thackeray: पंतप्रधान मोदींनी १० वर्षे देशाला फसवलं; नाशकातून उद्धव ठाकरेंनी मोदींवर डागली टीकेची तोफ

Uddhav Thackeray In Nashik Rally: महाविकास आघाडीचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजप शरसंधान साधलं.

Bharat Jadhav

नाशिक: राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी नकली शिवसेना, उद्योग धंदे, प्रचार सभा, शिवसेना भ्रष्टाचारावरून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. संपूर्ण फौजफाटा तुमच्याकडे आहे. तरीही तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना डांबून ठेवत आहात. शिवसैनिकांना अडकवत आहात. इतकं सर्व असूनही तुम्हाला मतांची भीक मागण्यासाठी दारोदारी आणि रस्त्यावर फिरावं लागतंय. मग तुम्ही इतकी दहा वर्ष काय केलं? माझ्या महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाला तुम्ही फसवलं, असा आरोप उद्धव ठाकरेंनी यावेळी पंतप्रधान मोदींवर केला.

नाशिकमधील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत ते बोलत होते. रोजगारीवरून बोलताना ठाकरे म्हणाले, वर्षाला दोन कोटी रोजगार देणार असल्याचं आश्वसन भाजपने पहिल्यांदा सत्तेत येताना केलं होतं. नोकरी शोधार्थ सुशिक्षित तरुणांचे जोडे झिजलेत.मोदींना मत दिल्यानंतर दिवस बदलतील आम्हाला नोकऱ्या मिळतील. परंतु तरुणांना कोणी नोकरीसाठी उभं करत नसल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणालेत.

गुजराती मराठी वादावरुनही उद्धव ठाकरेंनी मोदींवर घणाघात चढवला.एकीकडे मराठी तरुण नोकरीसाठी वणवण फिरतोय तर तर दुसरी काही शेफारलेले गुजराती सरेआमपण मराठी मुलांना नोकरी नाकरतात. सरळ जाहिरातीतून ते मराठी मुलांना परवानगी नाही असं थेट सांगतात. ही मस्ती आम्ही मराठी माणसांने का सहन करायच? असा दमदाटीपणा आम्ह आमच्या घरात सहन करायचा? असा सवाल उद्धव ठाकरेंनी समस्त नागरिकांना केला. जसे आमचे उद्योग गुजरातमध्ये नेले त्याप्रमाणे या तुमच्या चमच्यांना गुजरातमध्ये न्या असं म्हणत उद्धव ठाकरे पंप्रधान मोदींना सुनावलं.

पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या तोंडचा घास गुजरातमध्ये पळवलाय. मागील दोन सत्रात महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून उपकार केले. मोठ्या संख्येने खासदार निवडून दिले. याच उपकाराची फेड भाजप अपकाराने करत असल्याचा घणाघात ठाकरेंनी यावेळी केला. यावेळी त्यांनी प्रफुल पटेल यांनाही डिवचलं.छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली होती.आता सुरतचे दोन बोके महाराष्ट्र लुटत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. परंतु माझ्या शिवसेना पक्षाच्या जाहीरमान्यात म्हटलंय त्याप्रमाणे आपण महाराष्ट्राला परत एकदा वैभव मिळवून देईल, आश्वसन उद्धव ठाकरेंनी नाशिकाच्या सभेत नागरिकांना दिलं.

नकली शिवसेनेच्या टीकेवरून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला. लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान मोदींनी प्रचाराचा धडाका लावलाय. त्यावरून उद्धव ठाकरेंनी मोदींना टोला मारलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रमिष्ट झालेत. प्रचाराचा ताण वाढल्याने त्यांची झोप कमी झालीय आणि झोप पूर्ण झाली नसल्याने डोक्यावर परिणाम होत असतो असं डॉक्टर म्हणतात, असं म्हणत त्यांनी मोदींना टोला मारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepali celebrities: मनीषा कोइरालापासून सुनील थापापर्यंत, या नेपाळी सेलिब्रिटींनी मनोरंजन विश्वातून जिंकली चाहत्यांची मनं

Fever: वारंवार ताप येणे 'हे' कोणत्या आजारांचे लक्षण आहे?

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; पोलिसांकडून मोठी कारवाई, ढोल ताशा पथकातील दोघांना अटक

Police Roles: राणी मुखर्जीपासून अजय देवगणपर्यंत, 'या' कलाकारांनी पडद्यावर साकारली पोलिसांची दमदार भूमिका

Skin Care: वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचं, तर घरच्या घरी करुन लावा ही पेस्ट, आठवड्याभरात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT