udayanraje bhosale statement on satara lok sabha constituency election
udayanraje bhosale statement on satara lok sabha constituency election saam tv
लोकसभा २०२४

Udayanraje Bhosale : दाेन्ही नेत्यांच्या वक्तव्याने सातारा लाेकसभा मतदारसंघ बुचकळ्यात, साता-यात उद्या भूमिका स्पष्ट करेन : उदयनराजे भाेसले

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर / नितीन पाटणकर

Satara Lok Sabha Constituency :

सातारा लाेकसभा मतदारसंघाच्या (satara lok sabha constituency) उमेदवारीबाबत भाजप नेते राज्यसभा खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale latest marathi news) यांना पक्षातील वरिष्ठ नेत्यांना निश्चित सिग्नल दिला असेल असे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. दरम्यान आज (बुधवार) खासदार उदयनराजे भाेसले यांनी पुण्याहून साता-याला जाताना उद्या (गुरुवार) आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

खासदार उदयनराजे भाेसले यांना भारतीय जनता पक्षातून उमेदवारी मिळाल्याचे संकेत मिळत आहे. केवळ अधिकृत घाेषणा हाेणे बाकी आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने सातारा लाेकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचा दावा करीत आहेत. मंगळवारी (ता. 26) देखील पवार यांनी भाजपचे नेते उदयनराजे भाेसले यांना समजावून सांगतील असे सूचक विधान केले.

खासदार उदयनराजे भाेसले हे काेणत्या चिन्हावर निवडणुक लढविणार हे अद्याप अधिकृतरित्या जाहीर झाले नसले तरी त्यांच्या समर्थकांनी कमळ चिन्हासह त्यांचे फलक तयार करुन राजेंच्या आज साता-यात स्वागताची तयारी केली आहे.

उदयनराजेंना बिनविरोध निवडून द्यावं : बुधाजीराव मुळीक

काही वेळापूर्वी उदयनराजे भाेसले यांनी साता-याकडे प्रस्थान केले. यावेळी उदयनराजेंना बिनविरोध निवडून द्यावं अशी मागणी जेष्ठ कृषी तज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी केली आहे. मुळीक यांनी पुण्यात उदयनराजे यांचे स्वागत केले. त्यानंतर मुळीक यांनी सातारच्या चिंतन आणि सर्व राजकीय पंचांना उदयनराजेंना बिनविरोध निवडून देण्याचे आवाहन केले.

त्यापूर्वी उदयनराजे भाेसले यांनी माध्यमांच्या एका प्रश्नावर सकारात्मक माहित मग काय मी नकारात्मक राहू का असे म्हटले. तसेच साता-यात आपली भूमिका स्पष्ट करु अशी टिप्पणी केली.

उदयनराजेंना ग्रीन सिग्नल : खासदार धनंजय महाडिक

खासदार धनंजय महाडिक म्हणाले उदयनराजेंच्या उमेदवारी बाबत वरिष्ठांचा निर्णय असणार आहे. मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. महाराज सुद्धा आज मोठी रॅली काढत आहेत, कदाचित त्यांना उमेदवारीची संकेत मिळाले असतील असेही महाडिक यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

SCROLL FOR NEXT