भाजप खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale latest marathi news) यांनी काॅंग्रेस पक्षावर (congress party) आज (शुक्रवार) गंभीर आराेप केला आहे. पुरावे गायब करण्याची परंपरा काँग्रेसची असून लोकं गायब करतात असे उदयनराजेंनी म्हटलं आहे. जलमंदिर पॅलेस येथे आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजे भाेसले यांनी काॅंग्रेसवर आराेप करताना ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी करणार असल्याचे नमूद केले. (Maharashtra News)
उदयनराजे भाेसले म्हणाले निवडणुका आहेत म्हणून मी बाेलत नाही. मी जे काय बाेलत आहे त्यावर विचार करणे गरजेचे आहे. राजेश पायलट (rajesh pilot) अध्यक्षपदाचा अर्ज भरण्यासाठी निघाले हाेते. त्यांचा अपघात झाला, माधवराव सिंधियांचे (madhavrao scindia) नेतृत्व मान्य करायला लागले त्यांचा पण अपघात झाला. वायएसआर रेड्डी (ysr reddy) हे लोकप्रिय होते त्यांचा सुद्धा अपघात झाला. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे असेही राजेंनी नमूद केले. उदयनराजे पुढं बाेलताना म्हणाले काॅंग्रेसमधील हे लोक जेव्हा नावारूपाला नव्हते तेव्हा काही झालं नाही. जेव्हा हे लाेक नावारूपाला आले तेव्हा कसं घडतं गेलं पाहा.
यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा केवळ निवडणुकीसाठी वापर
यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा काँग्रेस पक्षाने फक्त निवडणुकी पुरता वापर केला. या देशातला सर्वात मोठा पुरस्कार भारतरत्न पुरस्कार यशवंतराव चव्हाण यांना द्यायला पाहिजे होता पण त्यावेळी का झालं नाही माहित नाही.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
येत्या 29 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा यशवंतराव चव्हाण यांच्या कर्म भूमीत होत आहे. त्यावेळी आम्ही यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करणार आहाेत असेही राजेंनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.