manda mhatre  Saam Tv
लोकसभा २०२४

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

BJP Workers Resigned In Navi Mumbai: नवी मुंबईच्या राजकारणात नवा ट्वीस्ट आला आहे. 'राजीनामा देणारे सर्वजण गणेश नाईक यांचे समर्थक आहेत. भाजपच्या मूळ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा नाही.', असे वक्तव्य भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांनी केले आहे.

Priya More

ठाणे लोकसभा मतदारसंघात (thane loksabha election 2024) महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरूच आहेत. आतापर्यंत ५३९ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. अशामध्ये नवी मुंबईच्या राजकारणात नवा ट्वीस्ट आला आहे. 'राजीनामा देणारे सर्वजण गणेश नाईक यांचे समर्थक आहेत. भाजपच्या मूळ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा नाही.', असे वक्तव्य भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांनी केले आहे.

मंदा म्हात्रे यांनी खुलासा केला की, 'राजीनामा देणारे गणेश नाईक यांचे समर्थक आहेत. मूळ भाजपच्या एकाही नगरसेवकाने आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला नाही. गणेश नाईकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या लोकांनीच राजीनामे दिले आहेत. मीरा- भाईंदरमधून राजीनामा देणारे देखील गणेश नाईक यांचे समर्थक आहेत.' तसंच, 'यापूर्वी ही राष्ट्रवादीत असताना अशाच पद्धतीने या लोकांनी राजीनामे दिले होते.', असे देखील त्यांनी सांगितले.

भाजपचे माजी नगरसेवक दिपक पवार यांनी देखील सांगितले की, 'मूळ भाजपच्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देणार नसल्याचे जाहीर केले आहे. पक्षाचे नेते जो आदेश देणार तो आम्ही मानणार असल्याचे सांगत भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.' मंदा म्हात्रे आणि दिपक पवार यांच्या वक्तव्यानंतर नवी मुंबईत आता भाजपमध्ये फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर येथील भाजपचे पदाधिकारी नाराज झालेत. या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरूवात केली असून आतापर्यंत ५३९ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर काही पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबई येथील भाजप कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांना नरेश म्हस्केंची उमेदवारी मान्य नाही. संजीव नाईक सक्षम उमेदवार असताना नरेश म्हस्केंना उमेदवारी का?, असा सवाल भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी निवडणुकित नरेश म्हस्के यांचे काम करणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

SCROLL FOR NEXT