Raju Shetty and Dhairyasheel Mane Saam Tv
लोकसभा २०२४

Hatkanangle Lok Sabha: हातकणंगलेत कोणाला हात, कोणाचा घात? मविआला शेट्टींचा अन् महायुतीला पाटलांचा धसका

Raju Shetty News: हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये पंचरंगी लढत निश्चित आहे. मागील लोकसभा निवडणुकीत मत विभाजनाचा फॅक्टर सेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या पथ्यावर पडला होता. आता तोच फॅक्टर इथे महत्त्वाचा होण्याची शक्यता आहे.

साम टिव्ही ब्युरो

Hatkanangle Lok Sabha:

हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये पंचरंगी लढत निश्चित आहे. महाविकास आघाडीकडून माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर , स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी , महायुतीकडून खासदार धैर्यशील माने, वंचित बहुजन आघाडीकडून डी. सी. पाटील आणि शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील, असे पाच उमेदवार रिंगणात आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत मत विभाजनाचा फॅक्टर सेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या पथ्यावर पडला होता. आता तोच फॅक्टर इथे महत्त्वाचा होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा धसका आहे. स्वाभिमानीला रघुनाथ पाटील, रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांचा तर महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेंना मविआचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर यांचा धसका आहे. हा मतदारसंघ ऊस पटट्यात येत असल्याने ऊसदरासंदर्भात केंद्र आणि राज्याची शेतकरीविरोधी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टींकडून ठासून सांगितली जात आहे.

राजू शेट्टी, उमेदवार, स्वाभिमानी शेतकरी संघटना

दरम्यान, या मतदारसंघातील मोठं शहर इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावरून उमेदवारांनी सावध भूमिका घेतली आहे. इचलकरंजीसारख्या मोठ्या शहरात नेत्यांच्या सभा घेण्याचे नियोजन स्थानिक पातळीवर सुरू आहे. इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी उमेदवारी जाहीर करून बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी रातोरात आवाडेंचं बंड थंड केलं. पण, शेवटच्या दिवसापर्यंत हा 'टेम्पो' ठेवणे महायुतीला कठीण आहे.

हातकणंगले मतदारसंघात हातकणंगले, शाहूवाडी, इचलकरंजी, शिरोळ तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. शाहूवाडीत जनसुराज्यचे विनय कोरे , हातकणंगलेत काँग्रेसचे राजू अवाळे इचलकरंजीत प्रकाश आवाडे (अपक्ष), शिरोळमध्ये राजेंद्र पाटील-यड्रावकर (अपक्ष), इस्लामपूरमध्ये जयंत पाटील (राष्ट्रवादी), शिराळ्यात मानसिंग नाईक (राष्ट्रवादी) हे आमदार आहेत.

हातकणंगलेची निवडणूक ही आजपर्यंत तरी दुरंगी स्वरूपाची झाली होती. यामुळे निवडणुकीचे आडाखे बांधणे सोपे होते. यंदा मात्र आजी-माजी आमदार, खासदार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशा दिग्गज प्रमुख चार जणांच्या लढतीमुळे हातकणंगलेमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: त्सुनामी म्हणजे काय आणि ती इतकी घातक का असते? जाणून घ्या माहिती

Maharashtra Live News Update: राज्यातील पाऊस झाला कमी, विदर्भाला येलो अलर्ट

Crime News : दुचाकीवरून आले, तरुणीला उचलून नेलं अन्...; धक्कादायक कारण आलं समोर, घटनेचा VIDEO व्हायरल

लालपरीतून ओलाचिंब प्रवास; बसमध्येच पावसाचं पाणी गळायला लागल्याने चालकावर प्रवाशांने धरली छत्री

Tariff: वस्त्रोद्योग, हिरे, दागिने अन् बरंच काही; टॅरिफचा भारताला बसणार फटका; या क्षेत्रांवर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT