Ravi and Navneet Rana and Anandrao Adsul Saam Tv
लोकसभा २०२४

Amravati Lok Sabha: राणा दाम्पत्य आणि अडसुळांमधील राजकीय वाद मिटला? आनंदराव अडसूळ राणांचा प्रचार करणार?

Navneet Rana and Anandrao Adsul: राणा दाम्पत्य आणि अडसुळांमधील राजकीय वाद मिटल्याची चर्चा आहे. कारण राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो, असं वक्तव्य शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळ यांनी केलीय.

साम टिव्ही ब्युरो

Amravati Lok Sabha News:

राणा दाम्पत्य आणि अडसुळांमधील राजकीय वाद मिटल्याची चर्चा आहे. कारण राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो, असं वक्तव्य शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळ यांनी केलीय. राणा दाम्पत्यानं अभिजीत अडसुळांची भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती अभिजीत अडसूळ यांनी दिलीय. तर मोदींसाठी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतल्याचं आमदार रवी राणा यांनी म्हटलंय.

अभिजीत अडसूळ यांनी नवनीत राणांबाबत सकारात्मक भूमिका घेतली. मात्र नवनीत राणांच्या मागे जात पडताळणींचं शुक्लकाष्ठ लावणारे आनंदराव अडसूळ पाठिंबा देणार का याबाबत दाट शंका आहे. राणा विरुद्ध अडसूळ संघर्ष 2013 पासून सुरु आहे.

राणा विरुद्ध अडसूळ संघर्ष

मिळालेल्या माहितीनुसा, 2013 मध्ये नवनीत राणांचं मोची जातीचं प्रमाणपत्र जात पडळताडणी समितीने वैध ठरवलं होतं. या निर्णयाविरोधात माजी खासदार आनंदराव अडसूळ उच्च न्यायालयात गेले होते. त्या मोची नसून पंजाबी चर्मकार असल्याचा दावा याचिकाकर्ते आनंदराव अडसूळ यांनी केला होता. 2021 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जात पडळताडणी समितीचा निर्णय रद्द करत राणांचं प्रमाणपत्र अवैध ठरवलं यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. अखेर सुप्रीम न्यायालयाने नवनीत राणांचं जातप्रमाणपत्र वैध ठरवल्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.

अमरावतीत आमदार बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर हे नवनीत राणांच्या पराभवासाठी पूर्ण ताकद पणाला लावणार आहेत. म्हणूनच आनंदराव अडसूळांचा पाठिंबा मिळवण्याचा राणांचा प्रयत्न दिसतोय.

दरम्यान, आनंदराव अडसूळांनी 2009 ते 2019 असं 10 वर्ष अमरावती मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं होतं. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर नवनीत राणांनी भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला. मात्र 2024मध्ये नवनीत राणा महायुतीच्या उमेदवार निश्चित झाल्यामुळे अडसुळांचा पत्ता कट झालाय.. त्यामुळे मोदींचं ध्येय गाठण्यासाठी आनंदराव अडसूळ राणांच्या प्रचारात उतरले तरी शेवटच्या दिवसापर्यंत अमरातीत नेमकं काय घडेल याचा नेम नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

SCROLL FOR NEXT