Solapur Politics Saam Tv
लोकसभा २०२४

Solapur Politics: शरद पवारांचे निकटवर्तीय देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, सोलापूरमध्ये नेमकं घडतंय तरी काय?

Abhijit Patil Meets Devendra Fadnavis: आज शरद पवारांचे निकटवर्तीय अभिजित पाटील देवेंद्र फडणवीसांची भेट घ्यायला पोहोचले आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार, या चर्चांना उधाण आलं आहेत.

Rohini Gudaghe

विश्वभूषण लिमये साम टिव्ही, सोलापूर

सोलापूरच्या राजकारणात (Solapur Politics) नेमकं काय चाललंय तरी काय, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. आज शरद पवारांचे निकटवर्तीय अभिजित पाटील देवेंद्र फडणवीसांची भेट घ्यायला पोहोचले आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहेत. अभिजित पाटील (Abhijit Patil) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमके कोणते खलबतं होणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

अभिजित पाटील हे शरद पवारांचे निकटवर्तीय आहेत. ते आज सोलापुरातील बालाजी सरोवर हॉटेलमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला पोहचले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (Abhijit Patil Meets Devendra Fadnavis) सोलापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी जाहीर सभा आहे. अभिजित पाटील हे फडणवीस यांच्या भेटीसाठी गेल्याने ते भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटील आज सोलापुरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत (Devendra Fadnavis News)आहेत. त्यामुळे त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहेत. अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य सहकारी बँकेने जप्तीची कारवाई केली आहे. त्यानंतर अभिजीत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली (Maharashtra Politics) आहे.

या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील हे देवेंद्र फडणवीस यांची भेट (Politics News) घेणार असल्याची माहिती मिळत आहे. या भेटीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. दोन दिवसांपासून अभिजित पाटील‌ हे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारापासून अलिप्त आहेत. त्यामुळे लवकरच अभिजित पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. अभिजीत पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास तो शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का मानला जाईल, कारण अभिजीत पाटील हे शरद पवारांचे विश्वासू मानले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT