Madha Lok Sabha Constituency  
लोकसभा २०२४

Maharashatra Election : माढ्याची लढत फडणवीसविरूद्ध पवार; 'तुतारी'चा आवाज सोलापुरात घुमणार?

Madha Lok Sabha Constituency : माढ्यातून मोहिते पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत. माढ्याच्या लढतीला आता पवारविरुद्ध फडणवीस असं स्वरुप आलंय. उत्तम जानकर यांची नाराजी दूर करण्यातही फडणवीसांना यश मिळालं तरीही माढ्यात शरद पवारांनी भाजपची केलेली कोंडी फडणवीस कशी फोडणार पाहुयात या रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Madha Lok Sabha Constituency : माढ्यात भाजपचा करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर आता डॅमेज कंट्रोलसाठी देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत. नाराज उत्तम जानकरांची मनधरणी करून फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांची पडती बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केलाय. विशेष म्हणजे उत्तम जानकरांना आणण्य़ासाठी फडणवीसांनी प्रायव्हेट जेटची सोय केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत...

माढ्यात रणजितसिंह निंबाळकरांविरोधात प्रचंड नाराजी होती.. याच नाराजीचा फायदा घेत शरद पवारांनी डाव आखला. भाजपने धैर्यशील मोहितेंना डावलल्यानंतर शरद पवारांनी मदतीचा हात पुढे केला. आणि शरद पवार गटातून उमेदवारीचं आश्वासन दिलं. धैर्यशील मोहितेंना तिकिट नाकारल्यामुळे भाजपने विजयसिंह मोहितेंची नाराजी ओढावून घेतली.

ज्या कारणासाठी मोहितेंनी पवारांची साथ सोडली होती. तोच कित्ता भाजपने गिरवल्यामुळे जुने मित्र पुन्हा एकत्र आले. दुसरीकडे काका पुतण्यामधील संघर्षाचाही पवारांना फायदा झाला. शरद पवारांची साथ सोडणारे रामराजे निंबाळकर माढ्यात अप्रत्यक्षरित्या सोबत आलेत. सोबतच संजीवराजे निंबाळकरांनीही धैर्यशील मोहितेंना पाठिंबा दिलाय..

दरम्यान ही लढाई आता माढ्यापुरती मर्यादित राहिलेली नाही.. धैर्यशील पाटलांनी सोलापूर लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या राम सातपुतेंचं पार्सल बीडला पाठवण्याचं चॅलेंज दिलंय.. तर सोलापुरकर माझं पार्सल दिल्लीला पाठवतील असा विश्वास राम सातपुतेंनी व्यक्त केलाय.

सोलापुरात मोहिते- पवारांची दोस्ती पुन्हा जमल्यामुळे भाजपची चिंता वाढलीय. माढ्याच्या लढतीचे पडसाद इतर मतदारसंघात उमटले तर 45चा आकडा गाठणं भाजपचं स्वप्नचं राहणार आहे..म्हणूनच सोलापूरच्या मैदानात डॅमेज कंट्रोलसाठी उतरलेले देवेंद्र फडणवीस काय खेळी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार? तारीख काय? जाणून घ्या

Horoscope Today : शिव उपासना फलदायी ठरेल, तर कोणाला मिळेल नवी दिशा आणि नवीन मार्ग; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today: तूळ, कुंभ, मिथुन राशींच्या लोकांसाठी लकी दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली, थंडीचा कडाका जाणवणार; पंखे, कुलर, एसी बंद

Maharashtra Politics : भाजपला का हवेत फडणवीसच? संघही अनुकूल, आमदारांचाही पाठिंबा

SCROLL FOR NEXT