Shrimant Shahu Maharaj Chhatrapati Saam Tv
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha: शाहू महाराज छत्रपती आज दाखल करणार उमेदवारी अर्ज, करणार जोरदार शक्तीप्रदर्शन

Kolhapur Lok Sabha constituency: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी, महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Kolhapur Lok Sabha Constituency News:

>> रणजीत माजगावकर

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी, महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी इंडिया आणि महाविकास आघाडीकडून जोरदार शक्‍तीप्रदर्शन करण्यात येणार असून त्यासाठी महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी जय्यत तयारी केली आहे.

या शक्‍तीप्रदर्शनाबाबत जनतेत कमालीची कुतूहलता असून कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे या शक्‍तीप्रदर्शनाकडे लक्ष लागून राहिले आहे. माजी खासदार संभाजीराजे, मालोजीराजे, संयोगिता राजे, मधुरिमाराजे, शहाजीराजे, यश राजे देखील यावेळी काढण्यात येणार्‍या रॅलीत सहभागी होणार आहेत.

ऐतिहासिक दसरा चौकातून सकाळी दहा वाजता शक्‍तीप्रदर्शन मिरवणुकीला सुरूवात होणार आहे. त्यासाठी मुस्लीम बोर्डिंगजवळ भव्य मंडप उभारण्यात आला आहे. जिल्ह्यातील कानाकोपर्‍यातून काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, डावे पक्ष, आम आदमी पक्ष, वंचित बहुजन आघाडीचे नेते, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या शक्‍तीप्रदर्शनात सहभागी होणार आहेत.

कोल्हापूर शहरासह कोल्हापूर दक्षिण, करवीर, गगनबावडा, कागल, गडहिंग्लज, राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा तालुक्यातील कार्यकर्ते या शक्‍तीप्रदर्शनासाठी रवाना होणार आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार जयश्री जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शिवसेना उपनेते व जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rush Driving: रस्त्यावर वाहन चालवताना 'या' चुका केल्या तर नाही मिळणार विमा: सुप्रीम कोर्ट

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Nails Cutting Tips: नखं कापण्यासाठी योग्य दिवस कोणता?

कन्नड नगरपरिषदेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना; थरारक VIDEO

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

SCROLL FOR NEXT