shivendraraje bhosale karykarta melava in satara constituency udayanraje saam tv
लोकसभा २०२४

Satara Constituency : शिवेंद्रराजेंच्या 'सुरुची'त उदयनराजेंविषयी तीव्र नाराजी (Video)

Udayanraje Bhosale: या पार्श्वभूमीवर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी शुक्रवारी सुरुची बंगला येथे कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उदयनराजेंविषयी कार्यकर्त्यांनी नाराजी बाेलून दाखविली.

ओंकार कदम

Shivendraraje Bhosale News :

खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale latest marathi news) यांच्याबाबत असलेली नाराजी शिवेंद्रराजेंनी सुरुची बंगला येथे आयाेजिलेल्या बैठकीत काही जणांनी उघडपणे मांडली. यावेळी शिवेंद्रराजेंनी उमेदवार काेणीही असाे आपल्याला महायुतीचा उमेदवार सर्वाधिक मतांनी निवडून आणायचा आहे असा निर्धार आपण केला आहे. त्यामुळे राजकारणात साता-यात पूर्वीपासूनचा स्थानिक पातळीवरचा संघर्ष असला तरी पंतप्रधान नरेंद्र माेदी, मुख्यमंत्री, दाेन्ही उपमुख्यमंत्री यांनी बाळगलेले ध्येय गाठायचे आहे असे मत शिवेंद्रराजेंनी बैठकीत व्यक्त केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात महायुतीचे स्थानिक पातळीवर तीन मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी वाई, सातारा आणि कराड या ठिकाणी हे मेळावे घेण्यात येणार आहेत.

या पार्श्वभूमीवर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी शुक्रवारी सुरुची बंगला येथे कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यातील स्थानिक नाराजीबाबत कार्यकर्त्यांनी चर्चा केली.

त्यानंतर आमदार शिवेंद्रराजे यांनी कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवरील राजकारण बाजूला ठेवून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सातारा जावळीच्या विकासाच्या अनुषंगाने भरघोस निधी दिला आहे. यासाठी आपल्यालाही मताच्या रूपाने महायुतीचा कोणताही उमेदवार असो त्याला निवडून आणण्याचा निर्धार करायचा असल्याचे मत व्यक्त केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT