Deputy CM Ajit Pawar  Yandex
लोकसभा २०२४

Ajit Pawar: बाबांनो काहीही करून घड्याळ चालायला पाहिजे, अजित पवारांचे जनतेला आवाहन

Ajit Pawar On Amol Kolhe: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या प्रचारार्थ अजित पवार (Ajit Pawar) यांची आज जाहीर सभा झाली.

Priya More

'काहीही करा बाबांनो घड्याळ चालायला पाहिजे. तुम्ही दिलेल्या मतदानाची व्याजासह परतफेड करेल.', असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या प्रचारार्थ अजित पवार (Ajit Pawar) यांची आज जाहीर सभा झाली. या सभेमध्ये त्यांनी शिरूरकरांना घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन केले.

अजित पवारांनी भाषणादरम्यान सांगितले की, 'काही करा बाबोनो काहीही करुन घड्याळ चालायला पाहिजे. तुम्ही दिलेल्या मतदानाची व्याजासह परतफेड करेल. उत्तर पुणे जिल्ह्यात बिबटे वाढलेत. याबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाबाबत दिल्लीत जाऊन चर्चा करेल. हा बिबट्या आम्हाला खायला लागलाय. माणसांसाठी बिबट्या घातक आहे.'

तसंच, 'जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर तालुक्यात शेतीला दिवसा वीज देण्याबाबत विशेष बाब म्हणून विचारधीन आहे. बिबट्यामुळे कुत्रा राहिला नाही म्हणून बिबट्या माणसांवर हल्ला करु लागला. बिबट्यासमोर कोल्हेला सोडा.', असा टोला त्यांनी अमोल कोल्हे यांना लगावला. तेव्हा सभेसाठी आलेल्या लोकांमधून आवाज आला कुणाला कुठं पाठवायचे तुमच्याच हातात आहे.

अजित पवार यांनी पुढे सांगितले की, 'पावसामुळे अनेक जण म्हणाले एकाच भाषणावर सभा संपवा. पण मी ऐकलं नाही. पाऊसानंतर ऊन पडले.' तसंच, एकच वादा नको बटन दाबायला जोर राहू द्या, असे आवाहन देखील त्यांनी जनतेला केले आहे. यावेळी सभेसाठी आलेल्या महिला पावसात बसल्या होत्या. त्यांना अजित पवारांनी सॅल्यूट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT