'आज विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला. पण उमेदवारी अर्ज भरायला मुख्यमंत्री आलेच नाहीत. मी त्यांना डमी उमेदवार म्हणतो ते उगाच नाही.', असा टोला लगावत खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. भोसरीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
अमोल कोल्हे यांनी या मेळाव्यात सांगितले की, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवाजीराव आढळराव पाटील यांना नव्हे तर, छगन भुजबळांना शिरुरमधून उमेदवारी देण्याचा प्लॅन होता.', असा गौप्यस्फोट महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केला आहे. त्यानंतर आज आढळराव पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर राहिले. त्यावरून अमोल कोल्हे यांनी डमी उमेदवार म्हणत आढळराव पाटलांवर निशाणा साधला.
'मुख्यमंत्री आलेच नाहीत. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, मी काय सभा घेणार नाही. मी फक्त रोड शो करून जाईल असं नागपूरकर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावरूनच स्पष्ट होतं आढळराव पाटील हे डमी उमेदवार आहेत.', असा टोला अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव अढळराव पाटील यांना लगावला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता अढळराव पाटील नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचे आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूर मतदार संघ हा एक आहे. या मतदार संघाममध्ये शिरुरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहिले आहेत. तर महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यापासून अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.