amol kolhe google
लोकसभा २०२४

Shirur Lok Sabha Result: घाटात केलाय राडा! अमोल कोल्हेंनी शिरूरमध्ये सलग दुसऱ्यांदा उधळला विजयाचा गुलाल

Amol Kolhe Statement, Lok Sabha Result: शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंनी विजयाचा गुलाल उधळला आहे.

Ankush Dhavre

शिरुर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. डॉ.अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव केला आहे. मतमोजनीला सुरुवात झाल्यापासूनच डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं होतं. विजय समोर दिसताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता. दरम्यान दुसऱ्यांदा विजय मिळवताच डॉ. अमोल कोल्हे यांनी जोरदार जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले आहे.

शिरुरचा गड राखल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की,' शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेचा हा विजय आहे. महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटकपक्षाच्या प्रत्येक कार्यकर्याने जी जीवापाड मेहनत घेतली आहे. त्याचं हे फळ आहे.'

तसेच ते पुढे म्हणाले की, ' शिरुर लोकसभेच्या जनतेने दुसऱ्यांदा ही जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे नक्कीच जबाबदारीची जाणीव आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करणं आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करणं हे माझं कर्तव्य आहे.'

अजित पवारांबाबत बोलताना ते म्हणाले की,' ते फार मोठे नेते आहेत. इतक्या मोठ्या नेत्याविषयी माझ्यासारख्या लहान कार्यकत्याने बोलू नये. जे काही उत्तर द्यायचं होतं ते शिरुर लोकसभेतील जनतेने दिलं आहे. नक्कीच विधानसभा निवडणूकांच्या वेळी आणखी पुढे ही तुतारी महाराष्ट्राभर कशी विनागत राहिल यादृष्टीने पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणं हेच माझं कर्तव्य आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पंढरपूर पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

Rose : जाणून घ्या गुलाबाचे फूल खाण्याचे ५ फायदे

Hirvi Mirchi Thecha: अस्सल गावरान पद्धतीचा हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा?

Shocking News : मुलीच्या शाळेची फी आणि TC मागायला गेले, संस्थाचालकांकडून बेदम मारहाण; वडिलांचा जागीच मृत्यू

Monsoon Skin Tips: पावसाळ्यात तेलकट त्वचेची समस्या? जाणून घ्या घरच्या घरी वापरता येणारे प्रभावी उपाय

SCROLL FOR NEXT