Balasaheb Thorat  Saam tv
लोकसभा २०२४

Balasaheb Thorat: कृपा करा; ३ लाखाच्या लीडची चर्चा करु नका... बाळासाहेब थोरातांचा ठाकरेंच्या उमेदवाराला सुचक सल्ला

Shirdi Loksabha Election: बाळासाहेब थोरात यांची संगमनेर तालुक्यात जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना, गैरसमजात राहू नका; आमच्यावर कृपा करा.. अशी हात जोडून विनंती बाळासाहेब थोरात यांनी केली.

Gangappa Pujari

सचिन बनसोडे, शिर्डी|ता. ३० एप्रिल २०२४

राज्यात लोकसभेचा रणसंग्राम सुरू असून राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी बाळासाहेब थोरात मैदानात उतरले आहेत. काल बाळासाहेब थोरात यांची संगमनेर तालुक्यात जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना, गैरसमजात राहू नका; आमच्यावर कृपा करा.. अशी हात जोडून विनंती बाळासाहेब थोरात यांनी केली.

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

"शिर्डीची जागा शिवसेनेच्या वाटेला गेली. अनेकांना वाटलं मी भांडलोच नाही. मात्र शिवसेनेने त्यांच्या 14 खासदारांच्या जागा आमच्याच हा पक्का निर्धार केला होता. एक जागा त्यांनी कोल्हापूरची महाराजांसाठी सोडली तर आमची सांगली गेली. शिर्डीत जरी शिवसेनेचा खासदार झाला तरी पाठिंबा काँग्रेसलाच देणार आहे, " असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

तसेच "वाकचौरे यांना संगमनेरातून लीड देण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. तीन लाखांनी येईल हे बोलू नका. लढावे लागणार आहे. तीन लाख म्हटलं का आमचा गडी ( भाऊसाहेब वाकचौरे ) थंड होतोय. पळत नाही जास्त. वाकचौरे गैरसमजात राहू नका, कृपा करा आमच्यावर. निवडून येणार आहे मात्र लोकांना समजून सांगावं लागेल. त्यामुळे तीन लाख तीन लाख या चर्चा करू नका," अशी विनंतही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली.

दरम्यान, शिर्डी लोकसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे.. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील तर महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी बाळासाहेब थोरात मैदानात उतरले आहेत. त्यामुळे प्रचारात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : दारूच्या नशेत विहीरीत उडी; एका व्यक्तीचा मृत्यू, पोलीस येताच गावकरी आक्रमक

Maharashtra Live News Update: सोलापुरात पत्नीचा पतीकडून खून; परिसरात खळबळ

Bonus Called In Marathi: दिवाळीला मिळणाऱ्या बोनसला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहितच नाही?

Diwali Dhanteras : धनतेरसच्या दिवशी धण्याची खरेदी का केली जाते? जाणून घ्या

Shocking News : संतापजनक! शासकीय बाल सुधारगृहात १० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT