Shrikant Shinde Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज का स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Shrikant Shinde : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदेंच्या हे कल्याण मतदारसंघाचे उमेदवार असतील, असे संकेत दिले होते. मात्र दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर शिवसेनेच्या दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली.

Bharat Jadhav

Shrikant Shinde Slams Aditya Thackeray: कल्याण आणि ठाण्याच्या जागेचा निकाल लागल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर घणाघाती हल्लाबोल केलाय. कल्याणमधून शिंदे गटाने श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली, उमेदवारी जाहीर होताच श्रीकांत शिंदेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर माध्याम प्रतिनिधींशी बोलतांना श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना डिवचलंय.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदेंच्या हे कल्याण मतदारसंघाचे उमेदवार असतील, असे संकेत दिले होते. मात्र दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर शिवसेनेच्या दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. त्यात ठाण्यातून नरेश म्हस्के आणि कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली गेली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरेश म्हस्के आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.

राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधताना श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना त्यांच्या चॅलेंजची आठवण करून दिली. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या विरोधात निवडणूक लढवावी, आपण कल्याण मतदारसंघातून उभे राहून निवडणूक लढवू असं आव्हान आदित्य ठाकरेंनी केलं होतं. त्याला आज श्रीकांत शिंदेंनी उत्तर दिलं. आदित्य ठाकरे नेहमी चॅलेंज करत असतात. पण आता कल्याणमधून दुसरा उमेदवार दिलाय. त्यामुळे आदित्य ठाकरेंना विचारण्याची गरज आहे की त्यांनी दिलेल्या चॅलेंज का नाही स्वीकारलं. चॅलेंज पूर्ण करायची गरज असते नाहीतर लोक सिरियसली घेत नाहीत, असा टोला श्रीकांत शिंदेंनी यावेळी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Saree Designs: पांढऱ्या साडीच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स, कोणावरही उठून दिसतील

Maharashtra Live News Update: CTET देणाऱ्या शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द करा - खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीची मागणी

Gold Price Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १० तोळे ८२,३०० रुपयांनी स्वस्त; वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

Heart Damage Symptoms: ही ४ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय झालंय खराब; वेळीच डॉक्टरांची घ्या मदत

Ajit Pawar Unseen Photos: अजित पवार यांचे तुम्ही कधीही न पाहिलेले फोटो

SCROLL FOR NEXT