Sharad Pawar Video Saam Digital
लोकसभा २०२४

Sharad Pawar Video : भाषण संपलं, कार्यकर्त्यांमधून आवाज आला; पाटणच्या सभेत शरद पवार यांनी उडवली कॉलर

Lok Sabha Election 2024 : साताऱ्यातील पाटणमधीप प्रचारसभेत शरद पवारांनी आज पुन्हा एकदा कॉलर उडवली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह पहायला मिळाला.

Sandeep Gawade

साताऱ्यातील पाटणमधील प्रचारसभेत शरद पवारांनी आज पुन्हा एकदा कॉलर उडवली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह पहायला मिळाला. शरद पवारांचं भाषण संपल्यानंतर कार्यकर्त्यांमधून आवाज आला आणि शरद पवारांनी कॉलर उडवली. शरद पवारांनी साताऱ्यात अनेकवेळा कॉलर उडवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सातारा लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ पाटणमध्ये सभा झाली. या सभेत संबोधित करताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

सातारा जिल्हा देशाचा आगळा वेगळा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील लोकांणी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. स्वातंत्र्यलढ्यात अनेकांचं योगदान आहे. यशवंतराव चव्हाण यांना भारत भूषण द्या, अशी मागणी होतं आहे. त्याचा आनंद आहे. पण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ही संस्था आहे. चव्हाण यांचं स्मारक मुंबईत आहे. संसदेतही चव्हाण यांचा फोटो आहे. अशा अनेक गोष्टी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची नोंद व्हावी, यासाठी केल्या आहेत. पण हा विषय निवडणुकीचा मुद्दा म्हणून आम्ही केला नाही, असं शरद पवार म्हणाले.

मोदींनी स्वतः काय केलं ते सांगाव?

यावेळी शरद पवारांनी, नरेंद्र मोदींच्या राज्यात महागाई, बेरोजगारी वाढली, भारतात 100 पैकी 87 तरुणांना काम नाही. स्वतः काय केलं ते मोदी सांगत नाहीत, अशी घणाघाती टीका केली.

कितीही गुन्हे दाखल करा पवारांची साथ सोडणार नाही; शशिकांत शिंदे

आम्ही गादीचा मान ठेवत तीन वेळा खासदार केलं, मात्र छत्रपतींच्या स्मारकाचं काय झालं?, असा सवाल शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसाठी राज्यात आणि देशात चांगलं वातावरण आहे, चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगत भाजप आणि नरेंद्र मोदींवरही निशाणा शाधला. राज्य आणि केद्र सरकारविरोधात रोष दिसून येत आहे. दरम्यान त्यांनी अजून कितीही गुन्हे दाखल करा मात्र शरद पवारांची साथ सोडणार नसल्याचा निर्धार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबलचक रांगा | VIDEO

Serial TRP: 'ठरलं तर मग' की 'थोड तुझ थोड माझं'; टीआरपीच्या शर्यतीत कोणी मारली बाजी?

अंतराळात अन्न पचण्यासाठी किती तासांचा कालावधी लागतो?

Naigaon News : वसईमध्ये भयंकर घटना, १० हजार किलो काचेचा ढिग अंगावर कोसळला; २ कामगारांचा मृत्यू

Maharashtra Politics: शिक्कामोर्तब! ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार

SCROLL FOR NEXT