Maharashtra Politics Saam Digital
लोकसभा २०२४

Sanjay Raut News : देशात सत्ता परिवर्तन होतंय, मोदींच्या निरोपाची तयारी सुरू; संजय राऊत कडाडले

Sanjay Raut on Lok Sabha 2024 Election Results : नरेंद्र मोदी यांच्या निरोप समारंभाची तयारी सुरू झाली आहे, असा टोलाही राऊतांनी हाणला आहे. ते मुंबईत माध्यमांसोबत बोलत होते.

Satish Daud

देशात परिवर्तन होत असून इंडिया आघाडीच सत्तेत येणार, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढे राहील आणि देशात इंडिया आघाडी २९५ पेक्षा जास्त जागा जिंकेल. नरेंद्र मोदी यांच्या निरोप समारंभाची तयारी सुरू झाली आहे, असा टोलाही राऊतांनी हाणला आहे. ते मुंबईत माध्यमांसोबत बोलत होते.

राज्यात लोकसभा सध्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यामध्ये महाविकास आघाडीसह देशात इंडिया आघाडीला मोठं यश मिळताना दिसून येत आहे. एक्झिट पोलमध्ये यावेळी भाजपची एकहाती सत्ता येईल, असे भाकित वर्तवण्यात आले होते. प्रत्यक्ष मात्र इंडिया आघाडीच्या अधिक जागा निवडून येताना दिसून येत आहे.

यावरच खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे विधानक केले आहे. मुंबईत माध्यमांसोबत बोलताना संजय राऊत म्हणाले, "नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून पहिल्या तीन फेरीत पिछाडीवर पडणं, हाच देशाचा कौल आहे. सध्या इंडिया आघाडी झपाट्याने पुढे जात आहे. दुपारी २ वाजेपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल".

माझ्या आकलनानुसार काँग्रेस पक्षाला जवळपास १५० जागा मिळतील. ज्या पक्षाला २०१९ निवडणुकीत ५० जागाही मिळाल्या नव्हत्या, तोच पक्ष आता १५० जागांच्या पुढे जात आहे. नरेंद्र मोदी यांच्या निरोप समारंभाची तयारी सुरू झाली आहे, असा टोलाही राऊतांनी हाणला.

महाराष्ट्रातील निवडणूक कलावर बोलताना संजय राऊत म्हणाले, "राज्यात महाविकास आघाडीने मोठी आघाडी घेतली आहे. विदर्भ, मराठवाड्यात महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. नंदुरबारमध्ये काँग्रेस उमेदवार १ लाख मतांनी निवडून येतील. तर, बीडमध्येही बजरंग बाप्पा पुढे आहेत, मुंबईतही शिवसेना मोठा विजय मिळवत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

SCROLL FOR NEXT