Sanjay Nirupam Saam Digital
लोकसभा २०२४

Sanjay Nirupam : संजय निरुपम यांची २० वर्षांनंतर घरवापसी; दोन दिवसात करणार शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Politics 2024 : पक्षविरोधी वक्तव्ये केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित केल्यानंतर मोठा निर्णय घेणार असं ठणकावून सांगणारे संजय निरूपम तब्बल २० वर्षांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Sandeep Gawade

पक्षविरोधी वक्तव्ये केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित केल्यानंतर मोठा निर्णय घेणार असं ठणकावून सांगणारे संजय निरूपम तब्बल २० वर्षांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. येत्या दोन दिवसांत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं निरुपम यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

संजय निरुपम काय म्हणाले?

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटायला बोलावलं होतं. पुढे काय करायचं याबद्दल चर्चा झाली. परवा कदाचित दुपारी तीन ते चार वाजता शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे. त्यानंतर शिवसेनेचे सर्व उमेदवार जिंकण्यासाठी प्रचार करणारल आहे. पक्षप्रमुख जिथे सांगतील तिथे जाऊन प्रचार करणार आहे. वीस वर्षानंतर पुन्हा एकदा माझ्या घरी मी प्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

बैठकीत काय झालं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईतील सहाही जागा महायुती जिंकणार असा विश्वास आहे. बैठकीत एकनाथ शिंदेंनी ,जे नाराज आहेत त्यांची समजूत काढली जाणार आहे. प्रत्येकाने महायुतीचा धर्म पळाला पाहिजे, कामाला लागा, पुढील भविषयसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची असल्याचं सांगितलं.समोरचे टीका करत राहणार त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही विकासाचा मुद्दा सगळ्यांसमोर मांडा, आपला अजेंडा हा "विकास" हाच असला पाहिजे. महाराष्ट्रातल्या इतर भागातील निवडणुका आता पूर्ण झाल्या आहेत, त्यामुळे तिथल्या आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची व्यवस्था मुंबईमध्ये करा, त्यांची मुंबईसाठी मदत घ्या, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांची पहिली घोषणा

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT