Sangli Politics Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Election: सांगलीत आज कॉंग्रेस कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक; विशाल पाटील यांच्याबाबत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता

Sangli Politics Congress Activist Meeting: सांगलीमध्ये आज काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Rohini Gudaghe

विजय पाटील साम टीव्ही, सांगली

विशाल पाटील यांच्या उमेदवारी बाबत आज सांगली जिल्ह्यातील (Sangli Politics) काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला काँग्रेस नेते देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये विशाल पाटलांच्या (Vishal Patil) अपक्ष उमेदवारीबाबत शिक्कामोर्तब आणि जिल्हा काँग्रेसची भूमिका स्पष्ट होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे.

महाआघाडीकडून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील आणि ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील दोघेही आग्रही होते. परंतु सांगलीची जागा सेनेला गेल्यामुळे जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले (Maharashtra Election) आहेत. काल मिरज तालुक्यातील काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव सुद्धा घेण्यात आला आहे.

सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीवरील काँग्रेस हे नाव काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुसले (Lok Sabha 2024) आहे. त्यांनी आपला निषेध व्यक्त करत विशाल पाटील यांनी अपक्ष उभे राहावे अशी मागणी देखील केलेली. सांगलीमध्ये राजकीय वातावरण तापलेलं असल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे.सांगलीमध्ये आज काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये विशाल पाटील (Lok Sabha) यांच्या उमेदवारीबाबत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सांगलीच्या जागेवर कॉंग्रेसने दावा केला (Maharashtra Politics) होता. परंतु शिवालय कार्यालयामध्ये महाविकास आघाडीची तसेच इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. तेव्हा महाआघाडीकडून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे कॉंग्रेस (congress) कार्यकर्त्यांमध्ये नाराजी झाली होती.

विशाल पाटील आता लोकसभा निवडणूक अपक्ष लढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेतल्याचं समोर आलं ( Congress Activist Meeting) होतं. परंतु कोणतीही अधिकृत घोषणा त्यांच्याकडून करण्यात आलेली नाही. आज होणाऱ्या बैठकीनंतर हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आजच्या या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागेललं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT