Nana Patole On Vishal Patil
Nana Patole On Vishal Patil Saam Tv
लोकसभा २०२४

Loksabha Election: सांगलीत आज काँग्रेसचा मेळावा; बंडखोर विशाल पाटील यांच्यावर कारवाई होणार?

विजय पाटील

सांगली|ता: २५ एप्रिल २०२४

विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर आज काँग्रेस पक्षाचा मेळावा सांगलीमध्ये पार पडत आहे. आजच्या मेळाव्याला काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील नेत्यांची मते लक्षात घेऊन विशाल पाटील यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगली लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी केलेले काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यावर पक्षातून निलंबनाची टांगती तलवार आहे. तसे संकेतही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांच्यासह विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत आज काँग्रेसचा संवाद मेळावा घेतला जाणार आहे.

त्यामध्ये जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी मते जाणून घेऊन विशाल पाटील यांच्यावरील कारवाईचा निर्णय होणार आहे. सांगलीच्या भावी नाट्य मंदिरामध्ये हा मेळावा पार पडत आहे. त्यामुळे आज अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सांगलीत तिरंगी लढत..

दरम्यान, सांगली लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासमोर महायुतीचे संजय काका पाटील यांचे आव्हान असेल. अशातच काँग्रेस नेते विशाल पाटील यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सांगलीतील लढत तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal: 'उद्या मी सर्व नेत्यांसोबत भाजप मुख्यालयात येतोय, ज्यांना अटक करायची आहे, करा', केजरीवाल यांचं थेट PM मोदींना आव्हान

Sobhita Dhulipala : गुलाबी ड्रेस अन् कानात झुमके छान छान, कान्समध्ये शोभिताचा जलवा!

Today's Marathi News Live: सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा

Akola News: मंदिरासाठी खोदकाम करताना जमिनीत आढळली २०० वर्षांपेक्षा जुनी इमारत; भिंतींवर होता 'राम' नामाचा उल्लेख

Akola Crime News : अकोल्यात गुरूच्या नात्याला कलंक; कुस्ती प्रशिक्षकानेच केला अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग

SCROLL FOR NEXT