Randeep Surjewala Saam Tv
लोकसभा २०२४

Randeep Surjewala: काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांना प्रचारबंदी, निवडणूक आयोगाने का केली कारवाई?

Lok Sabha Election 2024: हेमा मालिनी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांच्यावर कारवाई केली आहे.

Pramod Subhash Jagtap

Randeep Surjewala News:

हेमा मालिनी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांच्यावर कारवाई केली आहे. आयोगाने सुरजेवाला यांना उद्या संध्याकाळी 6 वाजल्यापासून पुढील 48 तास रॅली आणि जाहीर सभा घेण्यास बंदी घातली आहे. या काळात त्यांना जाहीर सभा, रोड शो, मुलाखती आणि प्रसारमाध्यमांमध्ये जाहीर वक्तव्ये करता येणार नाहीत. 'आज तक'ने याबाबत वृत्त दिलं आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार रणदीप सुरजेवाला यांनी हरियाणातील कैथल (कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघ) येथे इंडिया आघाडीचे उमेदवार सुशील गुप्ता यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित करताना भाजप नेत्या आणि मथुराच्या खासदार हेमा मालिनी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.

त्याच्या वक्तव्यावरून वाद वाढल्यानंतर सुरजेवाला यांनी स्पष्टीकरण दिले होते. ते म्हणाले होते की, 'माझा हेतू त्यांचा (हेमा मालिनी) अपमान करण्याचा किंवा त्यांना दुखावण्याचा नव्हता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. 9 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांना हेमा मालिनी यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

रणदीप सुरजेवाला म्हणाले होते, तुम्ही संपूर्ण क्लिप पाहा, आम्ही हेमा मालिनी यांचा पूर्ण आदर करतो. त्यांचं लग्न धर्मेंद्रजी यांच्याशी झाले आहे आणि म्हणून त्या आमच्या सुनबाई आहेत. ते म्हणाले, सार्वजनिक जीवनातील प्रत्येकाने जनतेला उत्तरदायी असले पाहिजे. मग ते मनोहर लाल खट्टर असोत की नायब सैनी असोत की मी. भाजप हा महिला विरोधी पक्ष असून तो खोटा प्रचार करतो.

दरम्यान, सार्वजनिक सभांमध्ये महिलांचा सन्मान राखण्याच्या सल्ल्याचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी आयोगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून त्यांच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया मागितली होती. निवडणूक आयोगाने सुरजेवाला यांना 11 एप्रिलपर्यंत नोटीसला उत्तर देण्यास सांगितले होते. खरगे यांना 12 एप्रिलपर्यंतची मुदत दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ...म्हणूनच रोहित पवार आमदार झाला, अजित पवारांचा टोला

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

SCROLL FOR NEXT