ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कॉफी केक हा एक टेस्टी केक असून झटपट बनणारी डिश आहे. व्हॅलेंटाइन डे येत असून, सेलिब्रेशन करण्यासाठी तुम्ही तुमच्या स्पेशल व्यक्तीसाठी हा केक बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी
कॉफी केक बनवण्यासाठी मैदा, साखर, बेकिंग पावडर, मीठ, दही, तेल, व्हॅनीला एसेंस आणि कॉफी पावडर इत्यादी साहित्य लागते.
मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ चाळून घ्या. दही, तेल आणि साखर वेगळे मिक्स करुन घ्या.
थोडे पाणी घ्या त्यात कॉफी पावडर टाकून मिक्स करुन घ्या. नंतर ती तयार केलेल्या दह्याच्या मिश्रणात टाका.
आता बॅटर बनवून घ्या. ओले आणि सुके साहित्य चांगले एकत्र मिक्स करुन घ्या. त्यात व्हॅनीला एसेंस टाका.
तयार केलेले सगळे मिश्रण ग्रीस केलेल्या पॅममध्ये टाका. १८० डिग्रीवर ३० ते ३५ मिनिटे बेक करुन घ्या.
केक बेक झाला आहे की नाही हे बघण्यासाठी केकमध्ये टूथपिक घालून चेक करा. जर टूथपिक स्वच्छ बाहेर आला तर केक पूर्णपणे बेक झाला आहे असे समजा.
केक थंड झाल्यावर, त्याचे लहान तुकडे करा आणि सर्व्ह करा. तुम्हाला वरुन चॉकलेट सिरप हवे असल्यास टाकू शकता.