ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
व्हॅलेंटाइन डे हा प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो. या खास दिवशी तुम्ही तुमच्या स्पेशल व्यक्तीसाठी घरच्या घरी चॉकलेट्स बनवू शकता.
चॉकलेट बनवण्यासाठी कोको पावडर, साखर आणि बटर इत्यादी साहित्य लागते.
कोको पावडर आणि साखर एकत्र करा आणि हे मिश्रण मंद आचेवर वितळवून घ्या. नंतर मिश्रण साच्यात ओता आणि ते फ्रिज मध्ये घट्ट होण्यासाठी ठेवून द्या.
दिलेल्या साहित्यात मिल्क पावडर टाका आणि मिक्स करुन घ्या. नंतर सेट करण्यासाठी ठेवून द्या.
कोको पावडर, बटर, मिल्क पावडर आणि साखर यांचे मिश्रण बनवा. व्हाईट चॉकलेट तयार करण्यास ठेवा.
मिश्रणात बदाम, काजू घालून चॉकलेट कुरकुरीत बनवा.
व्हॅनिला, ऑरेंज, मिंट एसेन्स किंवा तुमचा आवडता फ्लेवर असे वेगवेगळे फ्लेवर्स तुम्ही चॉकलेटच्या मिश्रणात घालू शकता.
तयार केलेली वेगवेगळी चॉकलेट्स चांगले पॅक करुन डब्यात एका थंड जागी ठेवून द्या.