ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पोहे व्हेज लॉलिपॉप हा एक कुरकुरीत आणि हेल्दी स्नॅक आहे. सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी तुम्ही ही डिश करु शकता.
पोहे व्हेज लॉलिपॉप करण्यासाठी जाड पोहे, उकडलेले बटाटे, गाजर, मटार, कांदा, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, धणेपूड, जिरेपूड, मीठ, गरम मसाला, कॉर्नफ्लोअर आणि ब्रेडक्रम्ब्स इत्यादी साहित्य लागते.
तुमच्या अंदाजानुसार पोहे घ्या. पोहे स्वच्छ धुवून 5 मिनिटे भिजत ठेवा. नंतर पोह्यांचे पाणी निथळून घ्या आणि हाताने थोडे मॅश करा.
कांदा बारीक चिरून घ्या. तसेच गाजर किसून घ्या आणि मटार उकडून घ्या. या सर्व भाज्या एकत्र करुन चांगले मिश्रण तयार करुन घ्या.
एका भांड्यात धुतलेले पोहे घ्या. उकडलेले बटाटे, सर्व तयार केलेल्या भाज्या, मसाले आणि मीठ घालून नीट मिक्स करुन घ्या. मिक्स केल्यानंतर मिश्रण घट्ट मळून घ्या.
तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे गोळे करा आणि त्यांना लॉलिपॉपसारखा आकार द्या. लॉलिपॉपला हवे असल्यास काडी किंवा टूथपिक लावा.
लॉलिपॉप आधी कॉर्नफ्लोअरच्या पिठात बुडवा, नंतर ब्रेडक्रम्ब्समध्ये मिक्स करा. त्यामुळे लॉलिपॉप कुरकुरीतपणा येतो.
एक मोठे भांडे घ्या. त्या भांड्यात तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात लॉलिपॉप टाका आणि लॉलिपॉप सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
पोहे व्हेज लॉलिपॉप हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत गरमागरम सर्व्ह करु शकता.