sunetra pawar, ajit pawar, raj thackeray Saam Tv
लोकसभा २०२४

Baramati Lok Sabha: सुनेत्रा पवारांसाठी राज ठाकरे मैदानात, बारामतीत ठाकरेंची तोफ धडाडणार

Raj Thackeray News: बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे.

साम टिव्ही ब्युरो

Baramati Lok Sabha:

मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्यावर जोरदार चर्चा सुरू झाली. पण अद्यापही मनसैनिक महायुतीच्या प्रचारात सक्रीय नसल्याचंच चित्र आहे. मनसेच्या पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन रणनीतीबाबत चर्चा केलीये. त्यामुळे बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे.

अजित पवार यांच्या निवासस्थानी मनसेची बैठक झाली. या बैठकीला मनसेचे नेते उपस्थित होते. बैठकीत बारामती लोकसभा मतदारसंघाविषयी चर्चा झाली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात मनसेचे तालुकास्तरीय मेळावे घेण्यात येणार आहेत. तसंच राज ठाकरे यांची सभा सुनेत्रा पवार यांच्यासाठी होणार आहे. या सभेची वेळ आणि ठिकाण ठरलेलं नाही. लवकरच ठिकाण ठरवलं जाईल, अशी माहिती आहे.

दरम्यान, बारामती लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. बारामतीत पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी अजित पवार यांच्यासह भाजपनं कंबर कसली आहे. सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी एकेकाळच्या राजकीय वैरी असणाऱ्यांसमोरही अजित पवार मैत्रीचा हात देताहेत. त्यामुळे बारामतीत राज ठाकरेंच्या सभेने वातावरण निर्मिती करण्याचा महायुतीचा प्लॅन आहे.

पंतप्रधान मोदींना पाठिंबा देऊन राज ठाकरेंनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. पण अद्यापही मनसेनं महायुतीसाठी सक्रीय प्रचाराला सुरुवात केलेली नाही. राज ठाकरेंच्या इंजिनची साथ लाभल्यास बारामतीत महायुतीची गाडी सुसाट धावण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामतीत राज ठाकरेंची तोफ धडाडणार का, हे पाहणं महत्त्त्वाचंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : भयंकर! १४ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली, दोघांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणात आरोपी भीमरावविरोधात आरोप निश्चित

Manoj Jarange Patil: उष्माघातानं जीव गेला तर जाऊ दे! सरकार जबाबदार असेन; मनोज जरांगे उपोषणावर ठाम

Heatwave in India: उष्णतेचा कहर वाढला! डॉक्टरांनी दिला हीट स्ट्रोक आणि डिहायड्रेशनपासून बचावाचा गंभीर इशारा

महागड्या गोळ्या-औषधं खाणं टाळा! शरीरातील रक्त वाढवण्यासाठी खा 'ही' ५ फळे

SCROLL FOR NEXT