Devendra Fadnavis On Raj Thackeray  Saam Tv
लोकसभा २०२४

Devendra Fadnavis: PM मोदींना राज ठाकरेंनी दिला बिनशर्त पाठिंबा, देवेंद्र फडणवीस यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis On Raj Thackeray: आज मनसेचा शिवतीर्थावर मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

Satish Kengar

Devendra Fadnavis On Raj Thackeray:

आज मनसेचा शिवतीर्थावर मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यावरच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिकिया देत राज ठाकरे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

देवेंद्र फडणवीस ट्वीट करत म्हणाले आहेत की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा अत्यंत आभारी आहे.'' (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावरच बोलताना भाजप नेते प्रवीण दरेकर

यावरच आपली प्रतिकिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,''विकसित भारताच्या संकल्पासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशाचे खंबीर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांच्या या पाठिंब्यामुळे महाराष्ट्रातील भाजपा- शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षांची महायुती अधिक मजबूत झाली आहे. त्यांच्या या निर्णयाचे मनापासून स्वागत.''  (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश विकास आणि समृद्धीच्या वाटेवर निघाला आहे. यात राज ठाकरे यांच्यासारख्या दुरदृष्टी लाभलेल्या नेतृत्त्वाची साथ मिळत आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महायुतीची गुढी अधिक मजबूत झाली आहे.''

याचबद्दल बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, ''राज ठाकरेंनी मोदींना जो बिनशर्त पाठिंबा दिला याचं स्वागत. जागांपेक्षा देश महत्वाचा आहे. काही मिळते यापेक्षा देश महत्त्वाचा आहे. तरुणांचं भविष्य महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणूस महत्त्वाचा. व्यापक विचारातून राज ठाकरेंनी निर्णय घेतला.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्याने सोडली पक्षाची साथ, भाजपच्या वाटेवर जाण्याच्या चर्चा

Maharashtra Live News Update : यवतमाळमध्ये शिंदेसेनेचे हजारो कार्यकर्ते भाजपात

Palghar Tourism : ना मरीन ड्राईव्ह, ना जुहू चौपाटी; वीकेंडला करा 'या' समुद्रकिनाऱ्याची सफर

Baloch Army attack Pakistan: पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला; 50 जवानांचा मृत्यू

MHADA Lottery: ठाणे, पालघरमध्ये म्हाडाची ५२८५ घरे; बदलापूर, सिंधुदुर्गात ७७ भूखंडांसाठी लॉटरी|VIDEO

SCROLL FOR NEXT