Rahul Gandhi News  Saam Digital
लोकसभा २०२४

Rahul Gandhi News : सत्तास्थापनेआधी राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट: निकालादिवशी ५ कोटी लोकांना स्टॉक खरेदी करण्याचे आदेश दिल्याचा आरोप

Rahul Gandhi On Stock Market Scam : लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशी म्हणजे ४ जून दिवशी शेअर मार्केटने सर्व रेकॉर्ड तोडले होते. त्यावरून राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत.

Sandeep Gawade

लोकसभेचा निकाल एनडीएच्या बाजूने लागला असून केंद्रात येत्या दोन तीन दिवसात सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. निकालाला दिवशी शेअर मार्केट कोसळला होता. त्यावरून पंतप्रधानांनी ५ कोटी लोकांना स्टॉक खरेदी करण्याचा आदेश का दिला होता? असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

४ जूनला निवडणुकीच्या निकालादिवशी शेअर मार्केट कोसळला होता. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. देशातील ५ कोटी लोकस शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. तरीही या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला का लावली? असा सवाल राहुल गांधींनी केला आहे.

नरेंद्र मोदींनी दोन चॅनलला मुलाखती दिल्या. या प्रकरणात त्या चॅनलचा रोल काय आहे?. लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले होते. त्यात परदेशातील गुंतवणूक वाढली होती त्यामुळे त्या एक्झिट पोलमध्ये भाजपचा संबंध काय आहे? या घोटाळ्याची जॉइंट पार्लमेंटरी कमिटीने (JPC) चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी २ जूनला एक्झिट पोलचे आकडे समोर आले होते. तेव्हा शेअर मार्केटने अचानक उसळी घेतली होती. मात्र, निकालादिवशी शेअर मार्केट अचानक कोसळला. मात्र त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी ५ कोटी लोकांना शेअर खरेदी करण्याचे आदेश दिले होते. असा दावा राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे तब्बल ३० लाख कोटींच नुकसान झालं. हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असून याचं सत्य लोकांसमोर आलं पाहिजे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निधी वाटपावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी - सुत्र

Maharashtra Election : निवडणुकीचे पडघम; नगरपालिका, नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

Lucky Zodiac Signs: पौर्णिमा तिथीच्या पवित्र योगात या राशी चमकणार! जाणून घ्या आजचं सविस्तर पंचांग आणि शुभ मुहूर्त

Budh Gochar 2025: राहूच्या नक्षत्रात आज होणार बुध ग्रहाचं नक्षत्र गोचर; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी

Chandrapur Farmer: शेतीच्या फेरफारासाठी 2 वर्षे टाळाटाळ; तहसील कार्यालयातच शेतकऱ्यानं घेतला टोकाचा निर्णय

SCROLL FOR NEXT