Vachint bahujan Aghadi Candidate Vasant More Saam Tv
लोकसभा २०२४

Pune Loksabha Election: "तुमच्या तात्याला साथ द्या" वसंत मोरेंची पुणेकरांना आर्थिक मदतची साद

Vasant More : यंदा पुण्यातील लोकसभेची लढत तिरंगी होणार आहे. महायुती आणि आघाडी, वंचितने उमेदवार दिल्याने पुण्यातील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी वसंत मोरे यांनी पुणेकरांकडे मदत मागितलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(अक्षय बडवे, पुणे)

Vachint bahujan Aghadi Candidate Vasant More: पुणे : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी फेसबूक पोस्ट करत पुणेकरांकडे आर्थिक मदत मागितलीय. लढाई खूप मोठी आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. आपण कुठेही कमी पडता कामा नये. त्यासाठी तुमच्या "तात्या" ला आर्थिक योगदानाची गरज आहे, अशी पोस्ट वसंत मोरे यांनी फेसबूकवर केलीय.

यंदा पुण्यातील लोकसभेची लढत तिरंगी होणार आहे. महायुती आणि आघाडी, वंचितने उमेदवार दिल्याने पुण्यातील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना उमेदवारी दिली आहे. सर्व राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धुराळा उडवला जात आहे. रोड शो आणि भव्य रॉली काढत उमेदवार आपला प्रचार करत आहेत. आपल्या प्रतिस्पर्धीला टक्कर देण्यासाठी वसंत मोरे यांनीही कंबर कसलीय. परंतु आर्थिक पाठबळ नसल्यानं वसंत मोरेंनी थेट आपल्या पुणेकरांना साद घातलीय.

"लढाई खुप मोठी आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. आपण कुठेही कमी पडता कामा नये. त्यासाठी तुमच्या "तात्या" ला आर्थिक योगदानाची गरज आहे," अशी फेसबूक पोस्ट वसंत मोरे यांनी केलीय. वसंत मोरेंनी फेसबूकवर पोस्ट करताना ऑनलाईन पेमेंटसाठी बारकोड अपलोड केलाय.

वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. वसंत मोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे ४ कोटी १६ लाख ६७ हजार ३६४ रुपयांची मालमत्ता आहे. लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या मोरे यांच्यावर ३ कोटी ४९ लाख २३ हजार ४३९ तर त्यांच्या पत्नीच्या नावावर १८ लाख ८९ हजार हजार रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्या मुलांच्या नावावर ४७ हजार १४७ रुपयांचे कर्ज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT