oves pechkar criticises narayan rane and vinayak raut ratnagiri sindhudurg lok sabha election Saam Digital
लोकसभा २०२४

Konkan Politics : भाजपने नारायण राणेंचा करेक्ट कार्यक्रम केला, सामंत बंधूही मदत करणार नाहीत? : ओवेस पेचकर, Video

kokan pradeshik paksh news : इकडचे स्थानिक नेते सामंत बंधू तेही नारायण राणे यांना मदत करणार नाहीत अशी आमची माहिती आहे असेही ओवेस पेचकर यांनी नमूद केले.

अमोल कलये

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election :

रत्नागिरी- सिंधुदूर्ग लाेकसभा मतदारसंघात प्रस्थापित नेत्यांनी म्हणजेच नारायण राणे आणि विनायक राऊत यांनी काही केलेले नाही. त्यामुळे यंदा काेकणी जनता प्रस्थापित नेत्यांना स्विकारणार नाही असा विश्वास कोकण प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष ओवेस पेचकर यांनी माध्यमांशी बाेलताना व्यक्त केला. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

कोकण प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष ओवेस पेचकर म्हणाले काेकणातील जनता प्रस्थापित नेत्यांना कंटाळली आहे. नारायण राणेंचा दोनदा आमदारकिला पराभव झाला आहे. या परिवाराला कोकणातील जनतेने नाकारलं आहे. नारायण राणे यांना उमेदवारी देऊन भाजपने त्यांचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे. त्यांनाही खात्री आहे की राणे निवडून येणार नाहीत. इकडचे स्थानिक नेते सामंत बंधू तेही त्यांना मदत करणार नाहीत अशी आमची माहिती आहे असे पेचकर यांनी नमूद केले.

पेचकर पुढे बाेलताना म्हणाले आमचे मुख्य प्रतिस्पर्धी विनायक राऊतच आहेत. 10 वर्ष राऊत यांनी काहीच काम केलेलं नाही. त्यामुळे कोकणची जनता 100 टक्के आमच्या सोबत आहे असा विश्वास पेचकर यांनी व्यक्त केला. यावेळी शकील सावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farhan Akhtar: फरहान अख्तरने खरेदी केली मर्सिडीज कार; किंमत वाचून नेटकरी थक्क

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना तब्येतीची काळजी घ्यावी लागणार, वाचा राशीभविष्य

Mumbai-Pune Express Way: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे होणार १० पदरी, प्रवास होईल आणखी सुसाट; काय आहे मेगाप्लान?

Dev Diwali 2025 date: कधी आहे देव दिवाळी? पृथ्वीवर येऊन देवता साजरी करणार दिवाळी, वाचा कथा

Maharashtra Live News Update: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही पोलिसांचे निलंबन करा- देवेंद्र फडणवीसांचे आदेश

SCROLL FOR NEXT