Nitin Gadkari Saam Digital
लोकसभा २०२४

Nitin Gadkari : ...तर रगडल्याशिवाय राहणार नाही; नितीन गडकरींनी बीडच्या सभेत कोणाला भरला दम?

Lok Sabha Election 2024 : नितीन गडकरी यांची आज बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेत विकासकामांवर आणि पालखी मार्गावर बोलताना ते कंत्राटदारांवर चांगलेच भडकलेले दिसले.

Sandeep Gawade

नितीन गडकरी यांची आज बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेत विकासकामांवर बोलताना ते कंत्राटदारांवर चांगलेच भडकले. महाराष्ट्राचे दैवत विठोबा असून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यामुळं मला सर्वात मोठा आनंद कोणता होत असेल तर तो म्हणजे पालखी मार्ग पूर्ण होत असल्याचा. मी कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरकडे भडवेगिरी केली नाही. त्यामुळं जो जो कॉन्ट्रॅक्टर बोगस काम करेल त्याला रगडल्याशिवाय गप्प बसणार नाही असं म्हणत त्यांनी त्यांनी कंत्राटदारांना दम भरला.

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला 60 वर्ष दिले त्यांनी काय केलं ? आता सोनिया गांधी अन् राहुल गांधी म्हणतात गरिबी हटाव. मात्र 60 वर्षात त्यांना गरिबी हटवता आली नाही ते आता काय करणार. तुम्ही काळजी करू नका, ही जेवढी कामे झाली ती ट्रेलर होती, अभि पुरी फिल्म बाकी है. त्यामुळं पंकजाला डबल इंजिन लावून निवडून द्या. आम्ही ठरवलंय भारताला विश्वागुरु बनवायचं आहे.

आमदार खासदार बनवायला आम्ही राजकारणात नाही आलो. मुंडे साहेबांची आज आठवण येतेय, ते जननेते होते, रात्री अपरात्री कोणीही आलं तर मुंडे साहेब त्याचं काम करायचे. महाराष्ट्राच्या राजकारण सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर महाराष्ट्रातील 2 नेते ते म्हणजे एक गोपीनाथराव मुंडे अन दुसरे महाजन असल्याचं त्यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

SCROLL FOR NEXT