Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadanvis Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha : महायुतीचा महाफॉर्म्युला फायनल! पक्ष, उमेदवार आणि प्रमुख लढतींचं चित्र स्पष्ट

Lok Sabha Election 2024: राज्यात आणि देशात लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदान प्रक्रियेचे दोन टप्पे पार पडले आहेत. यातच राज्यात अखेर महायुतीच्या जागावाटपाचे चित्र स्पष्ट झाले आहे. महायुतीत 48 जागांचे वाटप पूर्ण झाले आहे.

Satish Kengar

Maharashtra Lok Sabha :

राज्यात आणि देशात लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदान प्रक्रियेचे दोन टप्पे पार पडले आहेत. यातच राज्यात अखेर महायुतीच्या जागावाटपाचे चित्र स्पष्ट झाले आहे. महायुतीत 48 जागांचे वाटप पूर्ण झाले आहे.

महायुतीत अनेक दिवसांपासून काही जागांवर तिढा कायम होता. यामध्ये प्रामुख्याने नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे या लोकसभेच्या जागेवरून रस्सीखेच सुरु होती. तर पालघरच्या जागेवर भाजपने दावा केला होता. यातच पालघरची जागाही भाजपचीच असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. याठिकाणी उमेदवाराची घोषणा लवकरच केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रात महायुतीचा फॉर्म्युला

राज्यात भारतीय जनता पक्ष 28 जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. तर शिवसेना शिंदे गट 15 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाला महायुतीत 4 जागा देण्यात आल्या आहेत आणि महादेव जानकर यांना 1 जागा देण्यात आली आहे.

नाशिकची जागा शिंदे गटालाच!

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत नाशिकची जागा कोणाला मिळणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून सातत्याने या जागेवर दावा केला जात होता. या जागेवरून स्वतः मंत्री छगन भुजबळ इच्छुक होते, असं बोललं जात होतं. मात्र अखेर ही जागा शिंदे गटाला सुटली आहे. आज येथून शिंदे गटाने येथून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

गोडसे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते नाराज झाल्याचं सांगण्यात येत आहे. येथून भुजबळ यांनी निवडणूक लढवावी, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा होती. आता येथून समता परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप खैरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे येथे तिरंगी लढत पाहायला मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; मुलीच्या लग्नाची चिंता, आमदार विजय शिवतारे धावले संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या मदतीला

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

वेळ येणार, धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर...; पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडची भारताला धमकी

Ajit Pawar Distributes Kunbi Certificates: मराठवाड्यात कुणबी दाखल्यांचं वाटप सुरू, भुजबळांचा सवाल – दाखले आधीच शोधून ठेवले होते का?

Virar Dahanu Local : वलसाड एक्स्प्रेसच्या इंजिनला आग; विरार ते डहाणू लोकलसेवा ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT