Sharad Pawar  Yandex
लोकसभा २०२४

Sharad Pawar: आगामी काळात प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात; शरद पवारांचं भाकित, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Rohini Gudaghe

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. २०२४ नंतरच्या राजकारणावर बोलताना त्यांनी मोठं भाकित केलं आहे. येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, अशी शक्यता शरद पवारांनी वर्तविली आहे. इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, २०२४ च्या निकालानंतर (Lok Sabha Election 2024) काही पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होतील, तर अनेक प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसबरोबर जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान शरद पवारांना (NCP Sharad Pawar) तुमचा राष्ट्रवादी पक्षदेखील कॉंग्रेसमध्ये विलीन होणार का? असा सवाल विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना ते म्हणाले की, मी आताच काही आमच्या पक्षाबद्दल सांगु शकत नाही. पक्षामधील सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच घाईमध्ये कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

शरद पवार यावेळी म्हणाले की, आमची विचारधारा काँग्रेससोबत जुळत आहे. दोन्हीही पक्ष नेहरु आणि गांधींच्या विचारसरणीवर चालणारे आहेत. नरेंद्र मोदींसोबत जुळवून घेणं अवघड असल्याचं शरद पवारांनी म्हटलं (Sharad Pawar On Congress) आहे. इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना शरद पवारांनी मोठं भाकित केलं आहे. त्यांनी कॉंग्रेसमध्ये अनेक पक्ष विलीन होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

देशात लोकसभा निवडणूक निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे, अशा वेळी शरद पवार यांनी महत्त्वपूर्ण भाकीत केलंय. देशातील काही प्रादेशिक पक्ष येणाऱ्या पुढील काळात काँग्रेसमध्ये (Congress) विलीन होतील, असे शरद पवारांनी म्हटलंय. त्यांच्या या भाकितामुळे आता राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. शरद पवारांनी प्रादेशिक पक्षांबाबत केलेलं हे वक्तव्य खूप महत्त्वरपूर्ण मानलं जात आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: बळीराजासाठी केंद्राची खास योजना! मिळतात ६ हजार रुपये; जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

Baba Siddiqui Death:सलमान खानला मारण्याची सुपारी, पानिपतमधून पनवेल पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Rahu Nakshtra Gochar: राहुच्या नक्षत्र गोचरमुळे 'या' राशी होणार मालामाल; नव्या नोकरीसह मिळणार अफाट पैसा

Maharashtra Politics: अखेर ठरलं! मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटला, १००-८०-८० फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT