Hemant Godse Saam Tv
लोकसभा २०२४

Hemant Godse: नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचा पराभव का झाला? गोपनीय अहवाल भाजपच्या वरिष्ठांकडे रवाना

Hemant Godse Lok Sabha Defeat Report Sent To BJP Seniors: नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव झाला आहे. त्यांच्या पराभवाचा गोपनीय अहवाल भाजपच्या वरिष्ठांकडे रवाना करण्यात आला आहे.

Rohini Gudaghe

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांनी विजयाचा गुलाल उधळला, तर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा दारूण पराभव झाला आहे. त्यांच्या पराभवाचा गोपनीय अहवाल भाजपच्या वरिष्ठांकडे रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. हेमंत गोडसे यांचा नाशिकमध्ये पराभव का झाला, या कारणांचा शोध घेतला जात आहे.

नाशिकमध्ये (Nashik Politics) भाजपचे ३ आमदार, ६५ माजी नगरसेवक असतानाही शहरात गोडसेंची पिछेहाट झाली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. आता नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचा पराभव नेमका का झाला? याचा शोध घेतला जात आहे. तर शिंदे सेनेकडूनही पराभवाच्या कारणांचा विश्लेषण केलं जात असल्याची माहिती मिळत आहे.

नाशिकमध्ये महायुतीकडून हेमंत गोडसेंची (Hemant Godse) उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे गोडसेंच्या उमेदवारीला झालेला विलंब, अँन्टी इन्कम्बन्सी, विरोधी उमेदवाराला प्रचारासाठी मिळालेला अधिकचा कालावधी, अशी काही कारणे समोर येत आहेत. यासोबतच अन्य कारणांसोबत गोडसेंच्या पराभवाचा अहवाल भाजपच्या (BJP) वरिष्ठांना सादर केला जाणार आहे. या लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये गोडसेंना मित्र पक्षांची मदत झाली की नाही, यासह अन्य कारणांवर विश्लेषण केलं जातं आहे. येत्या एक ते दोन दिवसात या सर्व माहितीचा मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

उमेदवारी उशीरा जाहीर झाली. अनेक स्पर्धक तयार झाले होते. मात्र उमेदवारी देण्यास विलंब झाल्यामुळे फटका बसला. शेतकऱ्यांच्या धोरणामुळे काही प्रमाणात नाराजी ग्रामीण भागात होती, कांद्याचा प्रश्न नाशिकमध्ये गंभीर झाला (Lok Sabha Election 2024) होता. संपूर्ण राज्यात याची अनुभूती दिसल्याची प्रतिक्रिया हेमंत गोडसेंनी निकाल जाहीर झाल्यानंतर दिली होती. लवकर उमेदवारी जाहीर झाली असती तर निकाल वेगळा असता, असं देखील हेमंत गोडसे यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT