Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Saam TV
लोकसभा २०२४

Mumbai Election Results 2024: मुंबई ठाकरेंची की शिंदेंची? महापालिकेचे चित्र आजच होणार स्पष्ट; 6 जागांचे निकाल ठरवणार

Maharashtra Lok Sabha Election Result Latest Update : आज मुंबईच्या सहा जागांवर लोकसभा निकाल जाहीर होणार आहेत. या निकालावरून मुंबईत ठाकरे की शिंदे कोणाचं वर्चस्व आहे, हेही स्पष्ट होणार आहे.

Satish Kengar

जवळपास दोन वर्षांपासून राज्यातील अनेक महानगरपालिंकेसह मुंबई महानगपालिकेची निवडणूक खोळंबली आहे. यातच आज काही वेळातच देशातील आणि राज्यातील लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे. आजच्या निकालाकडे फक्त लोकसभेचे निकाल म्हणून न पाहता, या निकालातून आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेचा कौल होणाला मिळू शकतो, याचा अंदाजही बांधण्यात येत आहे.

यामध्येच गेल्या अनेकवर्षांपासून निर्विवाद वर्चस्व राहिलेला मुंबईत पक्षफुटीनंतर ठाकरे गट की शिंदे गट कोणाचे वर्चस्व आहे, हे देखील स्पष्ट होणार आहे. मुंबईत लोकसभेच्या सहा जागा आहेत, यामध्ये तीन जागांवर ठाकरे गट आणि शिंदे गटाची थेट लढत आहे. तर एक जागेवर ठाकरे गट विरुद्ध भाजप आणि दोन जागेवर भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे.

मुंबईच्या सहा जागांवर अशी आहे लढत

दक्षिण मुंबई - अरविंद सावंत (ठाकरे गट) विरुद्ध यामिनी जाधव (शिंदे गट)

उत्तर पश्चिम - अमोल कीर्तिकर (ठाकरे गट) विरुद्ध रवींद्र वायकर (शिंदे गट)

दक्षिण मध्य - राहुल शेवाळे (शिंदे गट) विरुद्ध अनिल देसाई (ठाकरे गट)

ईशान्य मुंबई - संजय दिना पाटील (ठाकरे गट) विरुद्ध मिहीर कोटेचा (भाजप)

उत्तर मध्य - उज्ज्वल निकम (भाजप) विरुद्ध वर्षा गायकवाड (काँग्रेस)

उत्तर मुंबई - पियूष गोयल (भाजप) विरुद्ध भूषण पाटील (काँग्रेस)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Police Transfer : मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या, कारण काय?

Maharashtra Live News Update: भरधाव अनियंत्रित चारचाकी कारने चार जणांना उडवले.अमरावती शहरातील मोती नगर मधील धक्कादायक घटना

Hair Care: तुमच्या केसांसाठी कोणता शॅम्पू आहे परफेक्ट, एकदा जाणून घ्या

पतीशी भांडण, पोलिसाशी अफेअर, शरीरसंबंध अन् हत्या; आरोपीचा खरा चेहरा 'असा' समोर आला

Palak Pakoda Recipe: थंडीत संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा स्ट्रीट स्टाईल पालक भजी, ही आहे सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT