mla vaibhav naik criticises mp narayan rane on kiran samant lok sabha election 2024 ratnagiri news sml80 saam tv
लोकसभा २०२४

Konkan Politics : नारायण राणेंनी दम दिल्याने किरण सामतांची निवडणुकीतून माघार; वैभव नाईकांचा राणेंवर गंभीर आराेप

Mla Vaibhav Naik News : तुम्ही केंद्रात मंत्री असताना या मतदारसंघात काय विकास केला असा सवालही आमदार वैभव नाईक यांनी राणेंच्या कामकाजाबाबत उपस्थित केला.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Ratnagiri Sindhudurg Constituency :

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील (ratnagiri sindhudurg lok sabha constituency) भाजप नेते खासदार नारायण राणे (mp narayan rane) यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. दरम्यान नारायण राणेंनी दम दिल्याने किरण सामंत (kiran samant) यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतल्याचा दावा आमदार वैभव नाईक (mla vaibhav naik) यांनी केला आहे. काेकणातील जनता मात्र अशा धमक्यांना भीक घालणार नाही असेही नाईक यांनी नमूद केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघातील जागेसाठी काही दिवसांपासून शिवसेना (shivsena) व भाजपमध्ये (bjp) रस्सीखेच सुरू हाेती. हे सुरु असतानाच आता लोकसभेच्या (lok sabha election 2024) जागेसाठी उमेदवार म्हणून भाजपाचे खासदार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाची जाेरदार चर्चा सुरु आहे. राणेंचे नाव निश्चित झाल्याचेही मानले जात आहे.

शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत (uday samant) यांचे बंधु किरण सामंत (kiran samant) यांनी माघार घेतल्याची देखील चर्चा आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक म्हणाले केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषदेमधून शिंदे गटाचे उमेदवार किरण सामंत यांना कशा पद्धतीने दम दिला हे कोकणातील जनतेने पाहिले. दम देऊन किरण सामंत हे उमेदवारी मागे घेऊ शकतात मात्र जनता अशा धमक्यांना भीक घालणार नाही असा टोला आमदार वैभव नाईक यांनी खासदार नारायण राणे यांना लगावला आहे.

तुम्ही केंद्रात मंत्री असताना या मतदारसंघात काय विकास केला असा सवालही आमदार वैभव नाईक यांनी राणेंच्या कामकाजाबाबत उपस्थित केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT