Maharashtra Loksabha Election Result:  Saam Tv
लोकसभा २०२४

Narendra Modi News: महाराष्ट्रात मोदी मॅजिक फ्लॉप! जिथे सभा, तिथे पराभव; काय सांगते आकडेवारी?

Maharashtra Loksabha Election Result: राज्यात लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी सभांचा धुरळा उडवला होता. परंतु राज्यात मोदी मॅजिक फ्लॉप ठरल्याचे चित्र दिसत आहे. पंतप्रधानांनी सभा घेतलेल्यांपैकी नेमके किती उमेदवार निवडून आले? जाणून घ्या सविस्तर.

Gangappa Pujari

देशात ४०० पार अन् राज्यात ४५ प्लसचा नारा घेऊन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष लोकसभेच्या मैदानात उतरला होता. राममंदिराचा मुद्दा, मोदींचा करिश्मा, प्रभावी प्रचार यामुळे सुरूवातीला ही निवडणूक एकतर्फी होईल, असेच चित्र होते. मात्र निकालानंतर एनडीला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे भाजपच्या दिग्गजांनी सर्वाधिक लक्ष घातलेल्या महाराष्ट्रातच सर्वात मोठा धक्का बसला असून मोदी मॅजिक फ्लॉप ठरल्याचे चित्र दिसत आहे. पंतप्रधानांनी सभा घेतलेल्यांपैकी नेमके किती उमेदवार निवडून आले? जाणून घ्या सविस्तर.

लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यामध्ये सभा अन् प्रचारांचा धडाका लावला होता. राज्यात त्यांच्या १८ सभा अन् १ रोड शो झाला. या झंझावती प्रचारानंतरही महाराष्ट्रात भाजपला जागा जिंकण्यात अपयश आले. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी सभा घेतलेल्या उमेदवारांचाच अनेक ठिकाणी पराभव झाला.

राज्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या पुणे, बारामती, शिरुर आणि मावळ या चार लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी रेसकोर्स मैदानावर सभा घेतली होती. यापैकी पुणे आणि मावळच्या फक्त दोन जागा महायुतीला मिळवण्यात आल्या. त्याचबरोबर माढा, सातारा, कोल्हापूर अन् सोलापूरमध्येही मोदींनी सभा घेतली. यापैकी सातारा वगळता सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले.

उत्तर महाराष्ट्रातही पंतप्रधान मोदींच्या सभांची जादू चालली नाही. पंतप्रधान मोदींनी नगर, नाशिक, दिंडोरी, नंदुरबारमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या. तसेच मराठवाड्यात बीड, लातूर, परभणी, धाराशिवमधील उमेदवारांसाठीही त्यांच्या सभा झाल्या. यांपैकी एकही ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून आला नाही.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भातही मोदींच्या सभा झाल्या. याठिकाणी नागपुर आणि अकोला वगळता आठ ठिकाणी महाविकास आघाडीने बाजी मारली. विदर्भात चंद्रपूर, रामटेक वर्धा याठिकाणी त्यांच्या सभा झाल्या होत्या. या तिनही ठिकाणी महायुतीचा पराभव झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या रस्त्यांवरून सरकारवर निशाणा; उद्योगांबाबतही गंभीर सवाल

Shiv Sena SC Case Live : आजची सुनावणी संपली, कोर्टानं दिली पुढची तारीख, वाचा युक्तिवादाचा शब्द ना शब्द

Cockroach : झुरळांमुळं हैराण झालात? घरातून झुरळांना पळवून लावण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा

Light Bill hike : महावितरणचा शॉक! तुम्हाला वीज बिल जास्त येणार, किती युनिटला किती दरवाढ? जाणून घ्या

महायुतीत पुन्हा वाद? MMRDAच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदेंची दांडी; उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीनं चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT