Loksabha Election Candidate Archana Patil Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Election: महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना दिलासा; सायबर पोलीस विभागाकडून क्लीन चीट

Archana Patil: धाराशीवमधील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याविरोधात सायबर पोलिसांकडून तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी पाटील यांना पोलिसांना क्लीन चीट देत त्यांना दिलासा दिलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बालाजी सुरवर्से ,

Mahayuti Dharashiv Loksabha Election Candidate Archana Patil :धाराशिव : महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना सायबर पोलीस विभागाकडून क्लीन चीट देण्यात आलीय. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी अर्चना पाटील यांच्याविरोधात सायबर विभागाकडे तक्रार केली होती. कोणत्या कारणामुळे ओमराजे निंबाळकर यांनी तक्रार दिली होती, हे जाणून घेऊ.

उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी अर्चना पाटील यांनी शक्ती प्रदर्शनासाठी जमा केलेली गर्दी ही भाड्याने आणल्याचा आरोप मविआचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी केला होता. अर्चना पाटील यांनी गर्दी जमवण्यासाठी पैसे देऊन गर्दी जमावल्याची तक्रार मविआचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी केला होता. निंबाळकर यांनी पुरावा म्हणून व्हिडिओ सायबर पोलिसांकडे दिला होता. ओमराजे निंबाळकर यांनी तक्रारीसोबत दाखल केलेले व्हिडिओ खोटे अर्थात इडिटेड असल्याचे सायबर अहवालात आले समोर आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी व्हिडिओची सत्यता तपासणीचे आदेश सायबर विभागाला दिले होते. सायबर पोलिसांनी लेखी अहवाल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला दिल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. तांत्रिक तपासणीत ओमराजेंकडून दिलेले व्हिडीओ खोटे असल्याचे आले समोर आहे.

धाराशीवमध्ये अर्चना पाटील यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

लोकसभेसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीच अर्चना पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज करताना मोठं शक्तीप्रदर्शन केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाइंसह महायुतीतील सर्व घटकपक्षांचे सर्वच प्रमुख नेत्यांनी त्याच्या यावेळी उपस्थिती लावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wildcat: मांजर कोणत्या बाजूने आडवी गेली तर काय करावं?

Kitchen Hacks: पीठ मळून फ्रिजमध्ये रात्रभर ठेवल्याने शरीराला त्रास होतो का? जाणून घ्या सत्य

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखणार, सरकारचं मोठं पाऊल, टास्क फोर्स नेमकं काय करणार?

Maharashtra Live News Update : राज्यात आज शिवजंयतीचा उत्साह

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

SCROLL FOR NEXT